VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:13 IST2025-10-29T16:13:12+5:302025-10-29T16:13:45+5:30
Goat and Girl Video: बकरीला बांधलेल्या दोरीचा मुलीला अंदाजच आला नाही...

VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
Goat and Girl Video: सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकजण रील्स बनवण्यात व्यस्त आहे. काही जण नाचून, तर काही जण गाऊन, तर काही जण अभिनय सादर करून किंवा विनोद करून रील्स बनवतात. कधीकधी लोक नकळत अशा रील्स तयार करतात, ज्यामुळे नेटकरी आपले हसू आवरू शकत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक मुलगी बकरीसोबत रील बनवताना दिसते, पण काही सेकंदांनंतर तिच्यासोबत जे घडते ते फारच विनोदी आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, एक मुलगी रील बनवत असते. एक बकरी तिच्या मागे चालत येते. ती तिच्या जवळ येते आणि थांबते. बकरीला एका खुंटीला बांधलेले असते, त्यामुळे ती फार पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे रील बनवणारी मुलगीही तिथेच बसते. पण प्रत्यक्षात, बकरीला बांधलेली दोरी खूप मोठी असते. त्यामुळे बकरी मागे येते आणि त्यानंतर अचानक मुलीला जोरात धडक मारते. त्या धडकेने मुलीचा बॅलन्स बिघडतो आणि ती खाली पडते. पाहा व्हिडीओ-
The influencer who wasn't able to calculate the length of the rope.pic.twitter.com/GFEbw2MQfr
— Massimo (@Rainmaker1973) October 27, 2025
हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Rainmaker1973 या अकाउंटने शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, त्या मुलीला दोरीची लांबी समजली नाही. हा १० सेकंदांचा व्हिडिओ १ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तसेच ४०,००० हून अधिक लाईक्स केले आहेत. लोकांनीही यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.