VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:05 IST2025-10-27T17:04:48+5:302025-10-27T17:05:24+5:30
cat electric shock video: व्हिडीओ पाहून लोकांनाही धक्काच बसतोय

VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
cat electric shock video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ माणसांच्याबद्दलचे असतात तर काही व्हिडीओमध्ये प्राण्यांसंदर्भात काहीतरी घटना असते. काही व्हिडीओ लोकांच्या मनाला स्पर्श करतात तर काही व्हिडीओ पाहून हसू येते. काही व्हिडीओ असेही असतात की जे पाहून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोकांनाही धक्का बसताना दिसतोय.
व्हिडिओमध्ये, मांजर एका विजेच्या तारेवरून चालताना दिसते. ती खांबाच्या जवळ येताच तिला अचानक एक जोरदार करंट बसतो. खांबाजवळ तारेवर एक छोटासा जाळ होतो आणि मांजर झटक्याने उडून थेट रस्त्यावर पडते. हा धक्का इतका जोरदार असतो की मांजर हवेत फेकली जाते आणि थेट रोडवर पडते. विशेष म्हणजे, विजेचा शॉक लागून आणि एवढ्या जोरदार पद्धतीने खाली पडूनही मांजरीला काहीही झाले नसते. व्हिडिओ पाहून सारेच अवाक् होताना दिसतात. पाहा व्हिडीओ-
Billu bhai ka yamraj k sath uthna baithna hai 😂 pic.twitter.com/EShQFWwQyN
— Rajat (@abeyaaaaaar) October 26, 2025
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @abeyaaaaaar या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याने लिहिले आहे की, बिल्लू भाईचा यमराजसोबत घरोब्याचे संबंध आहे. हा १० सेकंदांचा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. काहींनी मात्र हा व्हिडीओ AI वापरून केलेला असल्याचे म्हटले आहे. पण काहींनी मात्र खूपच भन्नाट कमेंट्स लिहिल्या आहेत.