सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:34 IST2025-10-01T16:33:02+5:302025-10-01T16:34:01+5:30
Sara Tendulkar speaking Marathi viral video : सारा आपल्या सहकाऱ्यांसोबत चालत बाहेर येत असतानाच पापाराझीने तिला गाठलं

सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
Sara Tendulkar speaking Marathi viral video : बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची मुलं म्हणजे स्टारकिड्स हा भारतात कायम चर्चेचा विषय असतो. तसेच क्रिकेटपटूंचे जीवन आणि त्यांची मुले हा विषय देखील विशेष चर्चिला जातो. भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर हीदेखील सातत्याने विविध कारणांनी प्रकाशझोतात असते. अलीकडेच साराने पिलेट्स अकॅडमी सुरू केली. तसेच ती ऑस्ट्रेलिया पर्यटन विभागाची भारतातील ब्रँड अम्बसेडॉर आहे. अशा विविध कारणाने सारा चर्चेचा विषय असते. त्यातच आता सारा तेंडुलकरमराठी भाषेतील संवादामुळे चर्चेत आली आहे.
साराचा पापाराझी समोर मराठीतून संवाद
सारा तेंडुलकर नुकतीच एका व्हायरल व्हिडीओमध्ये मराठी बोलताना दिसली. हा क्षण सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका सलोन किंवा हॉटेलमधून बाहेर पडताना दिसते. आसपासचा परिसर पाहता, हा व्हिडीओ दक्षिण मुंबईतील असल्याची शक्यता आहे. सारा तेंडुलकर आपल्या सहकाऱ्यांसोबत चालत येते. ती आपल्या कारच्या दिशेने जात असते, तितक्यात पापाराझी तिला फोटोसाठी पोज देण्याची विनंती करतात. पण सारा घाईत असल्याने झटपट कारपर्यंत जाते. यावेळी कारमध्ये बसताना सारा आपल्या महिला सहकाऱ्याची वाट पाहत असते. त्यावेळी सारा मराठीतून 'ती पण येतेय...' असे बोलताना दिसते. खरे पाहता सारा ही मराठमोळ्या सचिनची लेक आहे. पण तिचे उच्चशिक्षण भारताबाहेर झाले आहे. तसेच, आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी सारा फारशी मराठी बोलताना दिसलेली नाही. त्यामुळे साराचा हा मराठीतून संवाद साधतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
साराचा हा पापाराझीसोबतचा व्हिडीओ @bollywoodsocietyy नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओसोबत 'साराचे मराठी भाषेतील उच्चार' असा टेक्स्टही टाकला आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट्स आल्या आहेत. यातील बहुतांश कमेंट साराच्या सौंदर्याचे कौतुक करणाऱ्या आहेत. तर काहींनी तिच्या मराठी बोलण्याबाबतही आपले विचार मांडले आहेत.