'या' देशात भारतीय करन्सीच्या १ हजारात खरेदी केल्या लाखो रूपयांच्या वस्तू, जाणून घ्या कशा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:28 IST2024-12-27T13:22:34+5:302024-12-27T13:28:59+5:30
Indian Travel Blogger in Bali: एका भारतीय प्रवाशाने इंडोनिशायाच्या बालीमध्ये १ हजार रूपयात काय-काय खरेदी केलं जाऊ शकतं हे सांगितलं आहे.

'या' देशात भारतीय करन्सीच्या १ हजारात खरेदी केल्या लाखो रूपयांच्या वस्तू, जाणून घ्या कशा?
Indian Travel Blogger in Bali: भारतात महागाई आकशाला भिडली आहे. लोकांना रोज लागणाऱ्या अनेक वस्तूंवर जीएसटी द्यावा लागत आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तू, पेट्रोलही महागलं आहे. अशात एका भारतीय प्रवाशाने इंडोनिशायाच्या बालीमध्ये १ हजार रूपयात काय-काय खरेदी केलं जाऊ शकतं हे सांगितलं आहे.
१ हजार रूपयात काय काय खरेदी कराल?
भारतातील बरेच लोक मित्रांसोबत इंडोनिशात फिरायला जातात. अनेक नवीन लग्न झालेले कपल्स बालीला हनीमूनला जाणं पसंत करतात. कारण इथे खर्चही कमी लागतो. अशात भारतीय ट्रॅव्हलर आकाश चौधरीने सांगितलं की, १ हजार रूपयात तुम्ही बालीमध्ये काय-काय खरेदी करू शकता. आकाशने आधी १ हजार रूपये इंडोनेशियाई रूपयात एक्सचेंज केले. एक्सजेंचनंतर त्याचं मूल्य १.८९ लाख रूपये इतकं झालं. आकाशनं सांगितलं की, या १ हजारात तुम्ही खूपकाही खरेदी करू शकता. दरम्यान, हा व्हिडीओ यावर्षीच्या मे महिन्यात रेकॉर्ड करण्यात आला होता आणि त्यावेळी तिथे १ हजार रूपये १.८२ लाख रूपयांच्या बरोबर होते.
तुम्ही बघू शकता की, आकाशनं ३,५०० रूपयांची पाण्याची बॉटल, २० हजार रूपयांची कॉपी खरेदी केली. तसेच ३० हजार रूपया इतरही काही वस्तू खरेदी केल्या. त्याशिवाय त्याच्याकडे काही पैसे वाचले, ज्यातून त्याने काही पदार्थ, पाणी, बिअर खरेदी केली. त्यानंतरही त्याच्याकडे २० हजार रूपये शिल्लक राहिले.
या व्हिडिओला आतापर्यंत ८२ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोक व्हिडिओवर भरभरून कमेंट्स करत आहेत. यावर यूजरनं लिहिलं की, 'आपण गरीब नाही तर चुकीच्या देशात आहोत'. दुसऱ्यानं लिहिलं की, 'असं असेल तर मी तिथे जाऊन आयफोन खरेदी करेल'.