Student made wooden ak-47 : सॅल्यूट! एनसीसी कॅम्पमध्ये ट्रेनिंगसाठी नव्हती रायफल; आयटीआय विद्यार्थ्यानं १०० रूपयात बनवली एके-47
By Manali.bagul | Updated: February 23, 2021 14:47 IST2021-02-23T14:27:54+5:302021-02-23T14:47:46+5:30
Student made wooden ak-47 : आईटीआईचा विद्यार्थी आशिष विश्वकर्मानं दोन दिवसांच्या आत या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आहे.

Student made wooden ak-47 : सॅल्यूट! एनसीसी कॅम्पमध्ये ट्रेनिंगसाठी नव्हती रायफल; आयटीआय विद्यार्थ्यानं १०० रूपयात बनवली एके-47
(Image Credit- Dainik Bhaskar)
इच्छा तेथे मार्ग हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. कितीही प्रतिकुल परिस्थिती असली तरी त्यातून मार्ग काढत समस्येवर उपाय शोधण्यात काहीजण यशस्वी होतात. आयटीआय कॉलेजमध्ये एनसीसीचा कॅम्प लावला होता. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आर्मीचं ट्रेनिंग दिलं जात होतं. पण कॅम्पमध्ये रायफल नव्हती. त्यामुळे ट्रेनिंगसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये नाजारीचं वातावरण निर्माण झालं. आईटीआईचा विद्यार्थी आशिष विश्वकर्मानं दोन दिवसांच्या आत या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आहे.
आशिषनं लाकडापासून रायफल बनवली आहे. ही रायफल तयार केल्यानंतर कॅम्पमधील सेनेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. ही रायफल एके- ४७ प्रमाणे आहे. त्याशिवाय यावर लेंन्ससुद्धा फिट केली आहे. या प्रयत्नांनंतर अधिकाऱ्यांनी त्याला सन्मानित केलं आहे.
६० रूपयांची लेंन्स, रंगवण्यासाठी ४० रूपये झाले खर्च
सागर येथील रहिवासी आशिष कुमार हा विश्वकर्मा सुतार कामाचा (कारपेंटर ट्रेंड) विद्यार्थी आहे. दोन रायफल तयार करण्यास त्याला २ दिवस लागले आहेत. यासाठी सुमारे शंभर रुपये खर्च आला आहे. यात ६० रुपयांचे लेन्स असून ते रंगविण्यासाठी ४० रुपयांचा खर्च आला आहे...तर नदीमध्ये बुडाली असती 'ही' चिमुकली, श्वानानं चलाकीनं वाचवला जीव; पाहा व्हिडिओ
गन बॅरल्ससाठी लोखंडी पाईप वापरण्यात आला आहे. सोशल मीडियावर आशिषवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अशी रायफल तयार करणं खूपच अवघड असतं. तरिही कमीत कमी साधनांचा वापर करत कमीत कमी खर्चात त्यानं ही बंदूक तयार केली आहे. हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल