This tragic photos reveal drug abuse within months mother share story of her son on facebook | आई तुझं लेकरू... नशेडी पोराची दूरवस्था, माऊलीने शब्दातून मांडली 'व्यथा'
आई तुझं लेकरू... नशेडी पोराची दूरवस्था, माऊलीने शब्दातून मांडली 'व्यथा'

हा फोटो जेनिफर सेल्फन यांच्या मुलाचा आहे. जेनिफर यांचा हा मुलगा हेरॉइनच्या जाळ्यात अडकलेला आहे. हा अमेरिकेत राहत असून त्याची आई जेनिफरने त्याच्यासाठी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यात या आईने जगाल सांगितलं आहे की, या घातक नशेमुळे त्यांच्या मुलाची काय स्थिती झाली आहे.

फेसबुकवर शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, 'हा हेरॉइन आणि मॅथचा(नशेचा प्रकार) चेहरा आहे. आज अनेकांची स्थिती अशीच झाली आहे. जे लोक मला ओळखतात त्यांना माहीत असेल की, माझा मोठा मुलगा कॉडी बिशप नशेच्या आहारी गेला आहे. मला अनेकांनी सांगितले की, मला जे वाटतं ते मी लोकांसमोर मांडलं पाहिजे. या प्रवासात मी एक गोष्ट शिकली आहे की, अनेकांनी याप्रकारचं दु:खं सहन केलं. पण त्याबाबत कधीच काही बोलले नाहीत'.

त्यांनी पुढे लिहिले की, 'कॉडी हा आजही वेगासमध्ये होमलेस आहे. अनेक आठवडे झाले, मला त्याच्याबाबत काहीच माहीत नाही. त्याची स्थिती वाईट आहे हे माहीत असणं फार वाईट आहे. तसेच त्याची स्थिती कशी आहे हे माहीत नसणंही वाईटच आहे. सोशल मीडियात मला असे अनेक लोक भेटले जे रिहॅबिटेशनच्या माध्यमातून यातून बाहेर आले आहेत. मला त्या लोकांचे धन्यवाद मानायचे आहेत, जे माझ्या मुलाशी बोलले आणि त्याच्यासाठी प्रार्थना केल्या'.

जेनिफर यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'हा फोटो ७ महिन्यांआधी काढला होता. इतक्या लवकर ही नशा एखाद्याची अशी स्थिती करू शकतो. चला...अमेरिकन लोकांनो हे संपवूया. कॉडी जर तुला ही पोस्ट दिसत असेल तर नक्की कॉल कर. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे'.

४१ हजारांपेक्षा जास्त शेअर

ही पोस्ट ४१ हजारांपेक्षा अधिक लोकांनी शेअर केली आहे. इतकेच काय तर लोक कॉडीच्या फेसबुक प्रोफाइलवर जाऊनही कमेंट्स करत आहेत. त्याला पुन्हा घरी येण्यासाठी विनंती करत आहेत. ड्रग्सशी संबंधित त्यांचे अनुभव शेअर करत आहेत.Web Title: This tragic photos reveal drug abuse within months mother share story of her son on facebook
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.