VIDEO : १० फूट लांब अजगरासोबत खेळताना दिसला २ वर्षांचा चिमुकला, व्हिडीओ पाहून हैराण झाले लोक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 16:39 IST2021-12-27T16:37:56+5:302021-12-27T16:39:56+5:30
Viral Video : हा व्हिडीओ खरंच आश्चर्याचा धक्का देणाराच आहे. हा व्हिडीओ कॅप्शनुसार इंडोनेशियातील असल्याचं दिसत आहे. ३० सेकंदाच्या या क्लीपला बघून तुम्हाला धडकी भरू शकते.

VIDEO : १० फूट लांब अजगरासोबत खेळताना दिसला २ वर्षांचा चिमुकला, व्हिडीओ पाहून हैराण झाले लोक...
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. यात एक छोटासा मुलगा एका विशाल अजगरासोबत खेळत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. लहान मुलगा अजगराचं तोडं पकडून त्याच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ खरंच आश्चर्याचा धक्का देणाराच आहे. हा व्हिडीओ कॅप्शनुसार इंडोनेशियातील असल्याचं दिसत आहे. ३० सेकंदाच्या या क्लीपला बघून तुम्हाला धडकी भरू शकते. पण हा लहान मुलगा अजिबात न घाबरता इतक्या मोठ्या अजगरासोबत खेळत आहे. काही सेकंदासाठी तर असं वाटतं की, अजगर जर नाराज झाला तर काय होई.
व्हिडीओत बघू शकता की, चिमुकला मुलगा १० फूट लांब अजगराच्या अंगावर झोपतो काय, खेळतो काय. अनेकांना प्रश्न पडला आहे की, असं कसं होऊ शकतं? पण हा व्हिडीओ खरा आहे. चिमुकला इतकी मस्ती करत असताना, हाताने तोंड पकडलेलं असतानाही अजगर शांत आहे.
हा व्हिडीओ nature27_12 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओ ८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यज मिळाले आहेत. लोक यावर लाइक्सचा पाऊस पाडत आहेत तर अनेकजण कमेंट्स करत आहेत.