Viral video : चालत्या गाडीतून मागच्यामागे पडला चिमुरडा; समोर आला काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 16:30 IST2021-03-17T16:23:56+5:302021-03-17T16:30:33+5:30
Trending Viral Video in Marathi : ज्या गाडीतून हा चिमुकला पडतो. त्या गाडीतून एक व्यक्ती धावत धावत मागे आणि मग...

Viral video : चालत्या गाडीतून मागच्यामागे पडला चिमुरडा; समोर आला काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ
जर तुम्ही लहान मुलांना घेऊन प्रवास करत असाल तर तुम्ही हा व्हिडीओ पाहायलाच हवा. कारण प्रत्येक लहान मुलगा या मुलाप्रमाणे नशीबवान नसतो. हा व्हिडीओ द सन द्वारे पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चालत्या कारमधून एक लहान मुलगा खाली पडला. मंगळवारी शिरीन खान यांनी ही व्हिडीओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त व्हूज मिळाले असून १ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
How can this even happen? pic.twitter.com/WXnWLeYIQY
— Shirin Khan شیرین (@KhanShirin0) March 16, 2021
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता लाल दिव्याच्या अनेक गाड्या पुढे जात आहेत. अचानक एका कारची डिग्गी उघडते आणि त्यातून एक चिमुकला खाली पडतो. ही घटना पाहताच आजूबाजूची दुसरी वाहनं थांबतात . त्यानंतर ज्या गाडीतून हा चिमुकला पडतो. त्या गाडीतून एक व्यक्ती धावत धावत मागे येते आणि आपल्या बाळात उचलून घेऊन जाते. गाडीतून पडल्यानंतर हा चिमुकला स्वतःचं उभा राहून चालू लागतो. दिवसाला फक्त १ केळी खाल्यानं वजन कमी होण्यासह मिळतात हे फायदे; या प्रकारचं केळं सगळ्यात जास्त गुणकारी
व्हायरल झालेला हा व्हिडीओ एक वर्ष जुना असल्याचं सांगितलं जात आहे. मागच्या वर्षी हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही घटना केरळची असल्याचे सांगितले जात आहे. आपीएस अधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ ट्विट करत लहान मुलांसह प्रवास करताना चाईल्ड सिट बेल्ट गरजेचा असल्याचे सांगितले आहे. कारण निष्काळजीपणामुळे जीवसुद्धा जाऊ शकतो. जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक्