"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:50 IST2025-12-25T13:48:52+5:302025-12-25T13:50:15+5:30
'एबो नोआ' (Eboh Noah) असे या तरूणाचे नाव आहे. सोशल मीडियावर याचे अने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यांत, तो २५ डिसेंबरला ख्रिसमरच्या दिवशी जग संपण्याचा दावा करत आहे.

"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
घानामधील एका तरुणाने, आपण आधुनिक काळातील 'नोआ' (Noah) असल्याचे म्हटले आहे. त्याने आपला संबंध थेट बायबलमधील नोआच्या कथेशी जोडला आहे. त्याने एक मोठी नावही (ऑर्क ऑफ नूह) तयार केली आहे. याशिवाय, या तरुणाने, २५ डिसेंबर रोजी भीषण पाऊस होईल आणि महापूर येईल, तेव्हा नावेत शरण घेणणारेच वाचू शकतील, असा दावा ही केला आहे. दरम्यान, काही लोक भीतीपोटी त्यांच्या नावेचा आश्रय घेण्यासाठी पोहोचत आहेत.
'एबो नोआ' (Eboh Noah) असे या तरूणाचे नाव आहे. सोशल मीडियावर याचे अने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यांत, तो २५ डिसेंबरला ख्रिसमरच्या दिवशी जग संपण्याचा दावा करत आहे. देवाने आपल्याला विनाश होणार असल्याची माहित दिली असून, प्रलयापासून वाचण्यासाठी नाव बनवण्याचा आदेश दिल्याचेही त्याने म्हटले आहे.
तीन वर्षे सतत पाऊस पडणार -
एबोच्या दाव्यानुसार, २५ डिसेंबरपासून सुरू होणारा हा पाऊस पुढील तीन वर्षे सतत पडेल. या काळासाठी त्याने दहा नावांचा ताफाही तयार केला आहे. या काळात तो आणि त्याच्या अनुयायांच्या रक्षणासाठी, तो नावा तयार करत आहे. द सनच्या वृत्तानुसार, ऑगस्ट महिन्यात "काय होणार आणि कसे होईल" या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या यूट्यूब व्हिडिओमुळे एबो प्रथम चर्चेत आला होता.
There’s Problems oo. A big problem.
— Ozor Ndi Ozor (@OzorNdiOzor) December 24, 2025
Happening live in 𝐺𝐻𝐴𝑁𝐴🇬🇭 .
Ghanians are hurrying to secure spots in one of the 8 arks built by Prophet Eboh Noah, who claims God revealed that the world will end tomorrow, December 25th, by flooding, and only those in his ark will be… https://t.co/dfz87EVRRqpic.twitter.com/RnC1rwaGLJ
व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एबो आणि त्याचे साहाय्यक लाकडी नावांवर हातोडा मारताना दिसत आहेत. यानावा त्या भीषण महापुरात टीकाव धरू शकणार नाहीत, एवढ्या छोट्या आहेत. याशिवाय त्याने ज्या नावा तयार केल्या आहेत, त्यांचा आकार बायबलमध्ये वर्णन केलेल्या पौराणिक नावांच्या तुलनेत फारच लहान आहे.
अशी आहे नोआची कथा?
बायबलमधील कथेनुसार, देवाने नोआला प्रलयापूर्वी एक महाकाय नाव बनवण्यास सांगितले होते. त्यामध्ये नोआचे कुटुंब आणि पृथ्वीवरील प्रत्येक जीवजंतूची एक जोडी सुरक्षित ठेवण्यात आली होती. त्या काळी सलग ४० दिवस आणि ४० रात्री पाऊस पडला होता, ज्यामध्ये संपूर्ण सृष्टी नष्ट झाली होती. आता एबो त्याच कथेची पुनरावृत्ती होणार असल्याचा दावा करत आहे.