VIDEO : गाडीत बसले होते टुरिस्ट, काही वेळातच तीन वाघांनी गाडीला दिला वेढा आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 15:02 IST2021-07-13T14:59:57+5:302021-07-13T15:02:22+5:30
व्हिडीओत दाखवलं गेलं आहे की, एक टुरिस्ट बसलेली गाडी उभी आहे आणि तीन वाघ तिथे येतात. हे वाघ या गाडीला पर्णपणे वेढा देतात. त्यानंतर काय होतं ते तुम्हीच बघा.

VIDEO : गाडीत बसले होते टुरिस्ट, काही वेळातच तीन वाघांनी गाडीला दिला वेढा आणि....
सोशल मीडियावर वाघ, बिबटे आणि सिंहाचे अनेक खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक तीन वाघांचा खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओत दाखवलं गेलं आहे की, एक टुरिस्ट बसलेली गाडी उभी आहे आणि तीन वाघ तिथे येतात. हे वाघ या गाडीला पर्णपणे वेढा देतात. त्यानंतर काय होतं ते तुम्हीच बघा.
हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओसोबत एक मजेदार कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी लिहिलंय 'बुफे लंच'. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक गाडी उभी आहे. ज्यात बरेच टुरिस्ट बसलेले आहेत. गाडीला जाळी लावलेली आहे. आतील लोक बाहेरील बघू शकतात. अशात तिथे तिथे तीन वाघ फिरत येतात आणि एक एक करून तिघेही गाडीला वेढा देतात.
Buffet lunch pic.twitter.com/61gjheO8GC
— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 10, 2021
वाघांचा हा खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. अनेकांचा केवळ व्हिडीओ बघून थरकाप उडाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २८ हजाजांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच लोक या व्हिडीओवर कमेंट्सही करत आहे.