Tiger and Dog Fight : कुत्रा आणि वाघाची भयंकर लढाई; पाहून सिंहाने ठोकली धूम, पाहा अनोखा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 15:11 IST2023-01-23T15:11:17+5:302023-01-23T15:11:26+5:30

Tiger and Dog Fight : तुम्ही अनेकदा दोन कुत्र्यांमधील भांडण पाहिलं असेल. पण, या Video मध्ये कुत्रा आणि वाघाचे भांडण पाहायला मिळत आहे.

Tiger and Dog Fight : A terrible fight between a dog and a tiger; Seeing this, the lion was shocked, watch the video | Tiger and Dog Fight : कुत्रा आणि वाघाची भयंकर लढाई; पाहून सिंहाने ठोकली धूम, पाहा अनोखा Video...

Tiger and Dog Fight : कुत्रा आणि वाघाची भयंकर लढाई; पाहून सिंहाने ठोकली धूम, पाहा अनोखा Video...

Tiger and Dog Fight : तुम्ही अनेकदा दोन कुत्र्यांमध्ये किंवा कुत्रा आणि मांजरीचे भांडण होताना पाहिलं असेल. प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. पण तुम्ही कधी कुत्र्याला वाघाशी भांडताना पाहिलं आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वाघ आणि कुत्रा यांच्यात जबरदस्त झुंज पाहायला मिळत आहे. अॅनिमल्स पॉवर नावाच्या इंस्टाग्राम पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये एक कुत्रा वाघाच्या कानाला चावताना दिसतोय. वाघाच्या कानावर कुत्र्याची घट्ट पकड असून, वाघ त्या कुत्र्याच्या जबड्यातून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतोय. पण, काही केल्या कुत्रा त्या वाघाला सोडायला तयार नाही. हे सर्व भांडण तिथेच बाजुला उभा असलेला सिंह बघतोय, पण तो त्यांच्या भांडणात पडत नाही. काही सेकंदानंतर सिंह तिथून पळून जातो.

हा व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयातील असल्याची माहिती आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘डॉग विरुद्ध टायगर’ असे लिहिले आहे. ऑनलाइन शेअर केल्यानंतर व्हिडिओला 25,000 हून अधिक लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. प्राण्यांमधील या असामान्य लढ्याने नेटीझन्सना धक्का बसला आहे.

 

Web Title: Tiger and Dog Fight : A terrible fight between a dog and a tiger; Seeing this, the lion was shocked, watch the video