अद्भुत! झाडावर फणा काढून एकत्र बसलेले दिसले तीन कोब्रा, फोटो बघून फुटला लोकांना घाम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 16:27 IST2021-11-18T16:20:30+5:302021-11-18T16:27:18+5:30

Cobra Snake Viral Photo : सापांचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील, पण असा नक्कीच पाहिला नसेल. लोक हा फोटो पाहून चक्रावून गेले आहेत.

Three cobra found together in Melghat jungle maharashtra photo goes viral | अद्भुत! झाडावर फणा काढून एकत्र बसलेले दिसले तीन कोब्रा, फोटो बघून फुटला लोकांना घाम...

अद्भुत! झाडावर फणा काढून एकत्र बसलेले दिसले तीन कोब्रा, फोटो बघून फुटला लोकांना घाम...

Cobra Snake Viral Photo : सोशल मीडियावर प्राण्यांचे वेगवेगळे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. यातील काही फोटो इतके अवाक् करणारे असतात की, बघून विश्वास बसत नाही. असाच एक फोटो महाराष्ट्रातील एका जंगलातील फोटोने सोशल मीडियावरील लोकांची झोप उडवली आहे. या फोटो तीन कोब्रा साप आहेत. सापांचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील, पण असा नक्कीच पाहिला नसेल. लोक हा फोटो पाहून चक्रावून गेले आहेत. कारण लोकांनी तीन कोब्रा सापांना अशाप्रकारे एकत्र पाहिलं नाहीये.

या फोटोत तीन काळ्या रंगाचे कोब्रा साप एकाच झाडावर फणा काढून बसले आहेत. हा अद्भुत नजारा लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण असा नजारा नशीबवाल्यांनाच बघायला मिळतो. सापांचे हे अद्भुत फोटो राजेंद्र सेमालकर यांनी १६ नोव्हेंबरला इंडियन वाइल्डलाईफ या फेसबुक पेजवर शेअर केले. याच्या कॅप्शनला लिहिलं होतं की, जादुई मेळघाट हरिसलच्या जंगलात दिसले तीन कोब्रा.

भारतीय वन अधिकारी सुसांत नंदा यांनी हा फोटो ट्विट केला आहे. त्यांच्या फोटोला भरभरून लाईक्स मिळत आहेत तर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. आतापर्यंत या फोटोला ३ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि ३०० पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत.

Web Title: Three cobra found together in Melghat jungle maharashtra photo goes viral