'या' व्यक्तीला १२ पत्नींकडून १०२ अपत्य, नातवंडांची संख्या वाचून चक्रावेल डोकं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:25 IST2024-12-26T11:25:24+5:302024-12-26T11:25:55+5:30
इतकी अपत्य असल्यानं ही व्यक्ती त्यांची नावंही विसरतो. ज्यामुळे त्यानं एक रजिस्टर बनवलं आहे, ज्यात त्यांची नावं लिहिली आहेत.

'या' व्यक्तीला १२ पत्नींकडून १०२ अपत्य, नातवंडांची संख्या वाचून चक्रावेल डोकं!
भारत आणि चीनची लोकसंख्या नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. भारताने चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे सोडलं आहे. लोकसंख्या कमी करण्यासाठी देशात वेगवेगळे उपक्रमही राबवले जात आहेत. मात्र, नायजेरियातील एका व्यक्तीला १० किंवा १५ नाही तर १०२ मुलंबाळं आहेत. इतकी अपत्य असल्यानं ही व्यक्ती त्यांची नावंही विसरतो. ज्यामुळे त्यानं एक रजिस्टर बनवलं आहे, ज्यात त्यांची नावं लिहिली आहेत.
१२ बायका, १०२ मुलं
या व्यक्तीला १०२ मुलं आहेत हा विषय इथंच थांबत नाही. या व्यक्तीला ५७८ नातवंडेही आहेत. याचा खुलासा स्वत: या व्यक्तीनं केला आहे. युगांडाच्या मूकीजा गावातील ही व्यक्ती आहे. ७० वर्षीय मुसा कसेरा असं या व्यक्तीचं नाव आहे. ही व्यक्ती सांगते की, इतक्या मोठ्या परिवाराचा सांभाळ करणं आता त्यांच्यासाठी अवघड झालं आहे. सोशल मीडियावर त्यांची ही कहाणी चर्चेचा विषय ठरत आहे.
मूसाकडे २० ते ३० घरं
मूसाने सांगितलं की, इतक्या मोठ्या परिवाराचा सांभाळ करणं सोपं नाही. आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आणि अनेकदा खाण्याचीही अडचण होते. मूकीजा गावात या व्यक्तीची २० ते ३० घरं आहेत. ज्यात त्यांचा परिवार सोबत राहतो.
सतराव्या वर्षी झालं होतं पहिलं लग्न
मूसा कसेरा यांच्या पत्नींकडून झालेल्या मुलांची सरासरी संख्या काढली तर प्रत्येक महिलेने कमीत कमी ८ ते ९ मुलांना जन्म दिला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा मुलांची संख्या रोखणं अवघड झालं तेव्हा त्यांनी पत्नींना गर्भनिरोधक गोळ्या दिल्या. मूसाचं पहिलं लग्न १९७२ मध्ये झालं होतं. तेव्हा तो केवळ १७ वर्षांचा होता. त्यानंतर एकापाठी एक १२ महिलांशी त्यानी लग्न केलं. पण त्यावेळी त्यानी लेकरांचा सांभाळ कसा करावा याचा विचार केला नाही.