हा फोटो बदलेलं तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, फक्त फोटोसोबत करा 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 20:22 IST2022-04-24T20:19:42+5:302022-04-24T20:22:26+5:30
एक फोटो सध्या नेटकऱ्यांना आवडत आहे. या फोटोमध्ये आवडण्यासारखं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हा फोटो पाहताच तुमचाही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करेल...

हा फोटो बदलेलं तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, फक्त फोटोसोबत करा 'हे' काम
सोशल मिडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होतात. त्यांच्यातील रहस्य शोधुन काढणे अत्यंत मजेशीर असते. अनेक नेटकऱ्यांना असे खेळ आवडतात त्यामुळे असे फोटो फार मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियावर व्हायरल होतात. असाच एक फोटो सध्या नेटकऱ्यांना आवडत आहे. या फोटोमध्ये आवडण्यासारखं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हा फोटो पाहताच तुमचाही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करेल...
वरील फोटो तुम्हाला अत्यंत रागीष्ट अशा रागवलेल्या माणसाचा दिसेल. पण हा फोटो उलटा करुन तर बघा तुमचा दृष्टिकोनच बदलून जाईल.
या फोटोत अत्यंत आनंदाने व दिलखुलासपणे हसणारा चेहरा दिसेल. हा फोटो आपल्याला हाच संदेश देतो की जीवन खुप सुंदर आहे पण आपण आपला दृष्टीकोन बदललता पाहिजे. वरकरणी रागीट दिसणारा फोटो उलटा करताच हसरा दिसतो म्हणजेच आयुष्यही नकारात्मक दृष्टीकोन बदलून सकारात्मकतेने पाहताच आयुष्य आनंदाने भरुन जाते.