मामा असावा तर असा! भाचीच्या लग्नात नोटांनी भरलेली बॅग दिली; नोटांचे गठ्ठे पाहून अनेकांना धक्का बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 12:00 IST2025-02-09T12:00:03+5:302025-02-09T12:00:27+5:30
भारतात लग्न मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात केली जातात. अनेकजण लग्नासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. सध्या अशाच एका लग्नाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

मामा असावा तर असा! भाचीच्या लग्नात नोटांनी भरलेली बॅग दिली; नोटांचे गठ्ठे पाहून अनेकांना धक्का बसला
भारतात लग्न मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात केली जातात. अनेकजण लग्नासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. सध्या अशाच एका लग्नाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या लग्नात मामांनी मिळून त्यांच्या भाचीला लग्नात पैशाची भरलेली बॅग दिली. राजस्थानमध्ये लग्नात हुंडा देण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार, बहिणीच्या मुलांच्या लग्नात, मामा रोख रक्कम, दागिने इत्यादी स्वरूपात हुंडा देतात.
राजस्थानमधील नागौरमधील सदोकन येथील तीन भावांनी त्यांच्या भाचीच्या लग्नात इतका हुंडा दिला की लोक पाहतच राहिले. या लग्नात मामांनी एक, दोन लाख रुपये नाही तर एक कोटी ५१ लाखांची रक्कम दिली आहे.
मेहुण्याला तडीपारीची नोटीस मिळाली, मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संतापले
या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. हे लग्न खूप भव्य होते आणि या लग्नात राजकीय पक्षांतील अनेक पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. लग्नादरम्यान, तीन मामांनी एकुलत्या एका भाचीला १ कोटी ५१ लाख रुपये रोख देण्यात दिले.
नोटांनी भरलेल्या अनेक सुटकेस आणण्यात आल्या आणि सर्व रोख रक्कम बाहेर काढून सर्व पाहुण्यांसमोर मोजण्यात आली. इतकेच नाही तर मामांनी त्यांच्या भाचीला २५ तोळे सोने आणि ५ किलो चांदीचे दागिनेही भेट दिले.
इतक्या रोख रकमेसह आणि इतक्या दागिन्यांसह, तिन्ही मामांनी नागौरमध्ये त्यांच्या भाचीला दोन भूखंडही दिले. या सर्व गोष्टींची अंदाजे किंमत ३ कोटी होते. तिन्ही मामांनी सुमारे ३ कोटी रुपयांचा हुंडा देऊ दिल्याचे समोर आले आहे.
राजस्थानमध्ये लग्नाची चर्चा
राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये हुंडा देण्याची परंपरा वर्षानुवर्षे जुनी आहे. ज्यावेळी बहिणीच्या मुलांचे लग्न होते तेव्हा भाऊ रोख रक्कम, दागिने आणि भेटवस्तू देऊन आपल्या बहिणीवरील प्रेम व्यक्त करतात.
या लग्नात ३ कोटी रुपयांचा हुंडा देण्यात आला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले सर्वजण अवाक झाले. या लग्नात राजस्थानचे माजी मुख्य सचेतक महेंद्र चौधरी, जयलचे माजी प्रमुख रिद्धिकरण लामरोड आणि हजारो लोकांची उपस्थिती होती.