काय सांगता! मनुष्याप्रमाणे 'विचार' करतं हे झाड, पण कसं रे भौ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 14:33 IST2021-01-06T14:31:39+5:302021-01-06T14:33:51+5:30
हिस्ट्री अॅन्ड स्टोरीज नावाच्या ट्विटर पेजवर या झाडाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या ट्विटनुसार, हे अनोखं झाड इटलीतील Puglia या ठिकाणी आहे.

काय सांगता! मनुष्याप्रमाणे 'विचार' करतं हे झाड, पण कसं रे भौ?
एक झाड मनुष्यासारखा विचार कसा करू शकतो? असा प्रश्न तुम्हाला पडण साहजिक आहे. झाडाकडेही मेंदू असतो का? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळू शकतात. इटलीमध्ये एक अनोखं झाड आहे. जे मनुष्याप्रमाणे विचार करतंय, असं म्हटलं जातं. होय...हे एक असं झाड आहे जे बघितल्यावर असं वाटतं जणू एखादा मनुष्य काहीतरी विचार करतोय.
हिस्ट्री अॅन्ड स्टोरीज नावाच्या ट्विटर पेजवर या झाडाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या ट्विटनुसार, हे अनोखं झाड इटलीतील Puglia या ठिकाणी आहे. दिसायला असं वाटतं की, जणू एखादी व्यक्ती विचार करत आहे. म्हणजे या झाडाची मुद्रा मनुष्य विचारात आहे अशी आहे. त्या कारणानेच या अनोख्या झाडाला 'द थिंकिंग ट्री' असं नाव देण्यात आलं आहे. म्हणजेच एक विचार करणारं झाड.
This, at least 2000 years old olive tree, is called "The Thinking Tree" by the locals. It is located in Puglia, in the South of Italy. pic.twitter.com/jhf5Uv51rH
— History And Stories (@TheFcts) January 5, 2021

या जगात अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्यावर विश्वास ठेवणं कठिण होतं. हे झाडही त्यापैकीच एक म्हणायला हवं. अर्थातच हे झाडं खरंखुरं बोलत नाही. पण ते दिसतं एका विचार करणाऱ्या व्यक्तीसारखं. खरंच हे अद्भूत आहे.