Video : केवळ ४ मिनिटात चोर घेऊन पळाले अख्ख एटीएम मशीन, सीसीटीव्हीत कैद झाली घटना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 13:43 IST2019-04-12T13:39:13+5:302019-04-12T13:43:13+5:30
एटीएम फोडून पैसे लुटल्याच्या वेगवेगळ्या विचित्र घटना तुम्ही पाहिल्या आणि ऐकल्या असतील.

Video : केवळ ४ मिनिटात चोर घेऊन पळाले अख्ख एटीएम मशीन, सीसीटीव्हीत कैद झाली घटना!
एटीएम फोडून पैसे लुटल्याच्या वेगवेगळ्या विचित्र घटना तुम्ही पाहिल्या आणि ऐकल्या असतील. पण अशी घटना कधीच पाहिली नसेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. उत्तर आयर्लॅंडच्या Dungiven शहरातील गॅस स्टेशनजवळ काही चोर तोंडावर मास्क घालून आले आणि जेसीबीच्या मदतीने अख्ख एटीएमच सोबत घेऊन गेले.
या चोरांनी जवळच सुरु असलेल्या कन्स्ट्रक्शन साइटहून जेसीबी मशील चोरी केली आणि दुकानाची भींत तोडून त्यांनी एटीएम बाहेर काढलं. त्यानंतर त्यांनी एटीएम मशीन त्यांच्या कारवर लादलं आणि पळाले. चोरांचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यात तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे जेसीबीने दुकान फोडून एटीएम मशीन बाहेर काढलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना रविवारी सकाळी ४ वाजता घडली. असे सांगितले जात आहे की, चोरांनी हा दरोडा केवळ ४ मिनिटात टाकला. चौकशीतून समोर आलं आहे की, जेसीबी बाजूच्या कन्स्ट्रक्शन साइटहून चोरी करण्यात आलं होतं. पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.