शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

तरुणीच्या डोळ्यासमोर तिची स्कुटी घेऊन पसार झाला अन् तिला कळलेही नाही, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 15:29 IST

रांनी चोरी करण्यासाठी नवी पद्धत अवलंबली आहे. याचाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Shocking Robbery Video Viral) होत आहे. यात स्कूटी चोरी करण्यासाठी चोराने वापरलेली पद्धत पाहून कोणीही हैराण होईल.

चोरीचे अनेक व्हिडिओ (Robbery Video) ऑनलाईन शेअर केले जातात. लॉक करण्यात आलेल्या गाड्याही कशा पद्धतीने चोरल्या जातात, हे तुम्हीही पाहिलं असेल. मात्र आता काळ बदलला आहे. लोक लॉक तोडण्याचंही कष्ट आता घेत नाहीत. यामुळे चोरांनी चोरी करण्यासाठी नवी पद्धत अवलंबली आहे. याचाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Shocking Robbery Video Viral) होत आहे. यात स्कूटी चोरी करण्यासाठी चोराने वापरलेली पद्धत पाहून कोणीही हैराण होईल.

चोरीचा हा व्हिडिओ फेसबुकपासून इन्स्टाग्रामपर्यंत सगळीकडे शेअर केला जात आहे. यात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली स्कूटी दिवसाढवळ्या कशा पद्धतीने चोरी करण्यात आली, हे पाहून सगळेच हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती सुरुवातीला रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या स्कूटीचं निरीक्षण करतो. त्याला समजतं की स्कूटी लॉक आहे. मात्र गाडीचं लॉक तोडण्याऐवजी त्याने वेगळीच शक्कल लढवली. त्याने गुपचून स्कूटीच्या सायलन्सरमध्ये एक कापड घातलं.

काही वेळाने एक तरुणी स्कूटीजवळ आली आणि गाडी सुरू करू लागली. मात्र, मागे कापड बांधलं असल्याने गाडी सुरूच झाली नाही. यामुळे ही तरुणी वैतागली. इतक्यात चोराने समोरून येत तिला मदतीची ऑफर दिली. सुरुवातीला त्याने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचं नाटक केलं. यानंतर ही मुलगी फोनवर बोलण्यासाठी थोडं दूर जाताच चोराने मागच्या बाजूला लावलेलं कापड काढून टाकलं आणि स्कूटी चालू करून गाडीसह तो तिथून फरार झाला.

हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही केला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, सावध राहा सतर्क राहा. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. भरदिवसा रस्त्यावर झालेली ही अजब चोरी पाहून सगळेच हैराण आहेत. व्हिडिओ पाहून असाही अंदाज लावला जात आहे, की हा व्हिडिओ लोकांना सावध करण्यासाठी बनवला गेला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामThiefचोर