जुळ्या लोकांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण ती बहिणींची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. तीन बहिणी, तिघीही एकसारख्या दिसणाऱ्या, तिघीही बॉडीबिल्डिंग करतात. यात फोटोत ज्या मुली आहेत, त्यांची नावे Adriana, Alessandra आणि Andrea Dantas अशी आहेत. तिघी एकसारख्या दिसतात आणि बॉडीबिल्डींग करतात. या बहिणी ब्राझीलच्या साओ पाउलो येथील राहणाऱ्या आहेत.

या तिघी बहिणींच्या अनेक गोष्टी एकसारख्या आहेत. आणि त्यांची फिटनेसची क्रेज पाहून सोशल मीडियातील लोकही अवाक् झाले आहेत.

तिघी इतक्या एकसारख्या दिसतात की, स्पर्धेचे परिक्षकही त्यांच्यातील फरक ओळखू शकले नव्हते.

इतकेच नाही तर त्यांची डाएटही एकसारखी असते. 

Alessandra सांगते की, 'आमचं नातं फारच मजबूत आहे. कारण आम्ही जास्तीत जास्त कामे एकमेकांच्या सल्ल्यानेच करतो'.

या तिघी बहिणींनी एकाच डॉक्टरकडून सर्जरी केली. त्यामुळेच तिघींचे केस एकसारखे दिसतात.


वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: These are the worlds only bodybuilding triplets which you cant tell the difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.