हद्दच झाली राव! लवंग, वेलची ठीक होते; या वधू वराने स्टेजवर हुक्का फुकून किस केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 18:26 IST2022-12-03T18:25:53+5:302022-12-03T18:26:20+5:30
आता घरच्यांनाही काही आक्षेप नसेल तर लोकतरी काय बोलणार म्हणा...

हद्दच झाली राव! लवंग, वेलची ठीक होते; या वधू वराने स्टेजवर हुक्का फुकून किस केला
आजकाल लग्न सोहळे म्हणजे एक प्रकारची फॅशन झाली आहे. यात काहीतरी हटके करण्यासाठी लोक काय काय करतील याचा नेम राहिलेला नाही. असाच एक वधू वरचा स्टेजवर किस करतानाचा व्हिडिओ वायरल झाला आहे.
आता घरच्यांनाही काही आक्षेप नसेल तर लोकतरी काय बोलणार म्हणा... पण एक जोडी अशी जमली की नवरा आणि नवरीला दोघानाही हुक्का प्यायची सवय. अशा जोड्याचे लग्न ठरले. आपल्या आधीच्या पिढीत एक थंडाची बॉटल, त्यात दोन स्ट्रो दिले जायचे. नवरा नवरी मग एकाचवेळी ते प्यायचे. आता नव्या जोडप्याची भिड थोडी चेपविण्यासाठी हौशी लोकांनी स्टेजवरच नवरीच्या तोंडात लवंग, वेलचीचा तुकडा देऊन वराने तो तोडवा अशी प्रथा काढली. आजच्या या व्हिडिओत जोड्याने त्याच्या पुढचे पाऊल टाकले आहे.
या जोडप्याने स्टेजवर हुक्का किस केला आहे. तो काय असतो ते video पाहिल्यावर समजेलच. पण नवरीने हुक्का ओढला, त्याचा धूर नवरदेवाच्या तोंडासमोर सोडला. नवरदेवाने पण हुक्का ओढला आणि नववधूने सोडलेल्या धुरावर सोडला.
या व्हिडिओला कॅप्शन पण तशीच देण्यात आली आहे. हुक्कप्रेमी लग्न करत आहेत... असे म्हटले आहे.