शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

धक्कादायक! सूप बनवण्यासाठी सापाचे केले तुकडे; २० मिनिटांनी सापानेच घेतला शेफचा जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 12:53 IST

सापाचे तुकडे केल्यानंतर देखील त्याने शेफवर हल्ला करून त्याचा जीव घेतला आहे.

Cobra Attack । नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अनोख्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या काही गोष्टी तर अशा असतात ज्यांच्यावर विश्वास देखील ठेवणे कठीण असते. सध्या अशीच एक घटना चर्चेचा विषय बनली आहे, ज्यामध्ये एका कापलेल्या कोब्राने शेफवर हल्ला केला आणि २० मिनिटातच शेफचा मृत्यू झाला. म्हणजेच कोब्राचे डोकं धडापासून वेगळे केल्यानंतर देखील तो जिवंत होता. ही धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. दक्षिणी चीनमधील एक रेस्टॉरंट सापांच्या सूपासाठी खूप प्रसिद्ध आहे. मात्र हा सूप आता शेफच्या चांगलाच आंगलट आला असून दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. लक्षणीय बाब म्हणजे शेफने सापाचे तुकडे करून २० मिनिटे भांड्यात ठेवले होते. 

दरम्यान, चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणारा शेफ पेंग फॅन इंडोचायनीज स्पिटिंग कोब्रा स्नेकच्या मांसापासून ताजे सूप बनवत होता. सापाच्या मांसापासून सूप बनवण्यासाठी त्याने सापाचे २० मिनिटे तुकडे केले. मात्र एवढा वेळ त्याचे तुकडे केल्यानंतर देखील त्या सापामध्ये जीव होता आणि त्याने शेफच्या डोक्यावर हल्ला केला. हल्ला झाल्याचे कळताच डॉक्टर घटनास्थळी आले मात्र त्यापूर्वीच शेफचा जीव गेला होता. 

तुकडे केलेल्या सापाने घेतला जीवशेफच्या निष्काळजीपणामुळेच त्याचा जीव गेल्याचे बोलले जात आहे. मात्र शेफला देखील कल्पना नव्हती की २० मिनिटे तुकडे केल्यानंतर सापामध्ये जीव राहील. विशेष म्हणजे तज्ञांच्या मते, कोब्राचे डोके कापल्यानंतर देखील त्याच्यामध्ये २० मिनिटे जीव राहतो. तसेच ही एक खूप दुर्मिळ घटना असल्याचे त्यांनी म्हटले. एकूणच कोब्रा सापाला कापल्यानंतर देखील त्याच्यात जीव असतो आणि त्याने केलेल्या हल्ल्यामुळे ३० मिनिटांतच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते. कारण कोब्राचे विष खूप धोकादायक असते. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाchinaचीनsnakeसाप