VIDEO : वळूच्या समोर अचानक आला दुचाकीस्वार, त्यानंतर जे झालं ते बघून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:05 IST2025-02-21T15:04:11+5:302025-02-21T15:05:02+5:30
Viral Video : एका वळूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यानं बाइकवरून जात असलेल्या व्यक्तीसोबत वळूनं जे केलं ते बघून तुम्हीही हैराण व्हाल.

VIDEO : वळूच्या समोर अचानक आला दुचाकीस्वार, त्यानंतर जे झालं ते बघून व्हाल अवाक्!
Viral Video : सोशल मीडियावर मोकाट वळूंचे अनेक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमध्ये वळू कशाप्रकारे लोकांवर हल्ला करतो हे बघायला मिळतं. काही व्हिडीओ तर इतके भयानक असतात की, ते बघून धडकीच भरते. अशाच एका वळूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यानं बाइकवरून जात असलेल्या व्यक्तीसोबत वळूनं जे केलं ते बघून तुम्हीही हैराण व्हाल.
व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता की, रस्त्याच्या बाजूला एक वळू उभा आहे. एका बाजूनं बाइकस्वार येत आहे. ज्याला बघून वळू भडकतो. अशात वळू आपल्याकडे येत असल्याचं बघून बाइकस्वार गाडी सोडून पळू लागतो, पण वळूही त्याच्या मागे तेवढ्याच वेगानं येतो आणि त्याला शिंगांवर घेऊन हवेत फेकतो. हा व्हिडीओ बघून लोक हैराण झाले आहेत आणि पोटधरून हसतही आहेत.
हा व्हायरल झालेला व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवर sajad_chabok_1_9_9_7 वर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बघून लोक अवाक् झाले आहेत आणि जर वळू कुठे दिसला तर सतर्क राहण्याचा इशाराही देत आहेत. जेणेकरून या व्यक्तीसारखं होऊ नये.
या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक म्हणाले की, यात व्यक्तीची चुकी आहे. तर काही म्हणाले की, वळूला राग येणं स्वाभाविक आहे कारण ती व्यक्ती अचानक घाबरली. या व्हिडिओवरून हे स्पष्ट होतं की, जंगली प्राण्यांना त्यांच्या सीमेची सुरक्षा करणं