VIDEO : झाडावर बसून मनमोहक आवाजात 'गुणगुणत' होता पक्षी, ऐकून लोक झाले मंत्रमुग्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:20 IST2024-11-29T15:13:38+5:302024-11-29T15:20:28+5:30

निसर्गाचे, वेगवेगळे जीव आणि प्राण्यांचे सुंदर फोटो शेअर करत असतात. त्यांचे काही व्हिडीओ देखील वेगळाच आनंद देणारे असतात. असाच एक 'मालाबार व्हिसलिंग थ्रश' नावाच्या पक्ष्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

The bird was 'humming' in a charming voice sitting on the tree, people were mesmerized by hearing it | VIDEO : झाडावर बसून मनमोहक आवाजात 'गुणगुणत' होता पक्षी, ऐकून लोक झाले मंत्रमुग्ध

VIDEO : झाडावर बसून मनमोहक आवाजात 'गुणगुणत' होता पक्षी, ऐकून लोक झाले मंत्रमुग्ध

निसर्ग खूप सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर मनाला जो आनंद मिळतो तो कशातच मिळत नाही. सोशल मीडियावर वाइल्ड लाइफ फोटोग्राफर्स नेहमीच निसर्गाचे, वेगवेगळे जीव आणि प्राण्यांचे सुंदर फोटो शेअर करत असतात. त्यांचे काही व्हिडीओ देखील वेगळाच आनंद देणारे असतात. असाच एक 'मालाबार व्हिसलिंग थ्रश' नावाच्या पक्ष्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

या पक्ष्याचं अद्भूत टॅलेंट म्हणजे हा पक्षी शिटी वाजवतानाही सुरात गुणगुणतो. ध्रुव पाटील नावाच्या एका यूजरने जेव्हा मालाबारला गुणगुणताना ऐकलं तेव्हा तो क्षण कॅमेरात कैद केला. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंट dhruvpatil_photography वर हा व्हिडीओ शेअर केला. 

पक्षी झाडाच्या फांदीवर आरामात बसून आहे. तो गुणगुणत आहेत. या पक्ष्याचा आवाज इतका सुंदर आहे की, ऐकून मनाला शांतता मिळते. यूजर्सना हा व्हिडीओ चांगला पसंत पडला आहे. मालाबार व्हिसलिंग थ्रशला 'व्हिसलिंग स्कूलबॉय' असंही म्हटलं जातं. 

लोक या व्हिडिओला भरभरून लाइक करत आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'हा आवाज थेरपीसारखा भासत आहे'. तर दुसऱ्याने लिहिलं की, 'हा आवाज फार सुंदर आणि मनाला शांतता देणारा आहे'. तिसऱ्याने लिहिलं की, 'फारच सुंदर पक्षी, मी इतका सुंदर पक्षी आधी बघितलाच नव्हता'.

Web Title: The bird was 'humming' in a charming voice sitting on the tree, people were mesmerized by hearing it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.