मरण पावलेल्या मालकाची वाट बघणाऱ्या श्वानाला राजकुमारीनं घेतलं दत्तक, फॅन्स खूश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:48 IST2025-01-29T15:47:25+5:302025-01-29T15:48:26+5:30

मू डेंग नावाचा हा श्वान नखोन राचासिमा प्रांतातील यामो मार्केटमधील एका ७-एलेवेन स्टोर बाहेर आपल्या मालकाची वाट बघत होता.

Thailand princess adopts dog who mourned dead owner outside store for weeks | मरण पावलेल्या मालकाची वाट बघणाऱ्या श्वानाला राजकुमारीनं घेतलं दत्तक, फॅन्स खूश!

मरण पावलेल्या मालकाची वाट बघणाऱ्या श्वानाला राजकुमारीनं घेतलं दत्तक, फॅन्स खूश!

मनुष्य आणि श्वानांच्या नात्याच्या तर अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी समोर येत असतात. श्वानाच्या इमानदारीचे अनेक किस्सेही चर्चेत असतात. काही दिवसांआधी थायलॅंडमधील एका श्वानाचा फोटो व्हायरल झाला होता. मू डेंग नावाचा हा श्वान एकाच जागी थांबून आपल्या मालकाची वाट बघत होता. पण त्याला काय माहीत की, त्याचा मालक आता येणार नाही. कारण तो मरण पावलाय. याच श्वानाला आता थायलॅंडची एक प्रिन्सेस Siribha Chudabhorn हीनं दत्तक घेतलं आहे.

मू डेंग नावाचा हा श्वान नखोन राचासिमा प्रांतातील यामो मार्केटमधील एका ७-एलेवेन स्टोर बाहेर आपल्या मालकाची वाट बघत होता. त्याची इमानदारी पाहून स्थानिक लोक त्याला कोराटचा हाचिको म्हणू लागले, जो जपानच्या प्रसिद्ध हाचिको श्वानासारखा आहे. हे श्वान आपल्या इमानदारी जगभरात प्रसिद्ध असतात. काही दिवसांआधी या श्वानाचे फोटो आणि त्याची माहिती फेसबुकवर शेअर करण्यात आली होती. हे फोटो मारी-मो फोटोग्राफीद्वारे पोस्ट करण्यात आले होते. ज्यात हा श्वास एका स्टोर लाल चादर अंगावर घेऊन आराम करताना दिसत आहे.

The Strait Times च्या एका रिपोर्टनुसार, मू डेंग श्वानाचा मालक बेघर होता. तो भीक मागण्यासाठी मू डेंगला रोज ७-एलेवेन स्टोर बाहेर सोबत नेत होता. आता हा श्वान रोज रात्री या स्टोरबाहेर झोपतो. आता मू डेंग याला हॉस्पिटलमध्ये दाखलं केलं असून काही दिवसांनी त्याला प्रिन्सेसच्या घरी शिफ्ट केलं जाईल.

नोव्हेंबर २०२४ मध्ये मू डेंगचा मालक आजारी पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. मालकाच्या मृत्यूनंतर मू डेंग रोज या स्टोरबाहेर मालकाची वाट बघत उभा असतो. त्यानंतर स्टोरच्या स्टाफनं या श्वानाला खायला दिलं आणि त्याची काळजी घेतली. मू डेंगच्या मनाला भिडणाऱ्या कहाणीकडे जगभरातील लोकांचं लक्ष वेधलं गेलं होतं. अनेकांनी त्याचं चांगलं व्हावं यासाठी प्राथर्ना केली होती. आता या श्वानाच्या फॅन्सना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. थायलॅंडची प्रिन्सेस Siribha Chudabhorn नं या श्वानाला दत्तक घेऊन त्याची जबाबदारी घेतली आहे.

प्रिन्सेस Siribha नं फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं की, "मू डेंगबाबत मला एका व्हिडिओच्या माध्यमातून समजलं होतं. त्यात लोक मू डेंगच्या मदतीसाठी पैसे गोळा करत होते. मी मू डेंगला आता दत्तक घेतलं आहे. माझ्याकडील श्वानांना धक्क्याचा सामना करावा लागला होता. कधी जखमेमुळे तर कधी कुणी मारल्यानं त्यांना धक्का बसला होता. मात्र, मू डेंग डिप्रेशनमध्ये आहे. मू डेंग अशा स्थितीत आहे की, त्याचा मेंदू या धक्क्याचा सामना करू शकत नाही. ही एक गंभीर मेंटल कंडीशन आहे. ज्याचा मू डेंगला आणखी फटका बसू शकतो". 

Web Title: Thailand princess adopts dog who mourned dead owner outside store for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.