धक्कादायक! आइस्क्रीम खाणार इतक्यात दिसला गोठलेला साप, फोटो बघून लोक 'कोमात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:41 IST2025-03-07T12:40:01+5:302025-03-07T12:41:10+5:30
Snake in Ice cream : थायलॅंडमधील एका व्यक्तीला आइस्क्रीममध्ये चक्क पूर्ण साप आढळला. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

धक्कादायक! आइस्क्रीम खाणार इतक्यात दिसला गोठलेला साप, फोटो बघून लोक 'कोमात'
Snake in Ice cream : पार्सल बोलवण्यात आलेल्या खाण्याच्या पदार्थांमध्ये कधी पाल तर कधी झुरळ, कधी अळ्या तर कधी उंदीर आढळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता तर हद्दच झाली. कारण थायलॅंडमधील एका व्यक्तीला आइस्क्रीममध्ये चक्क पूर्ण साप आढळला. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रेबन नाकलेंगबून असं या व्यक्तीचं नाव असून त्यानं फेसबुकवर याचे फोट पोस्ट केले आहेत. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं की, "इतके मोठे डोळे. खरंच तो मृत आहे ना? ब्लॅक बीन, आइस्क्रीम विक्रेता. ओरिजनल फोटो. कारण ही मी स्वत: खरेदी केली आहे".
ब्लॅक बीन हा आइस्क्रीमचा एक प्रकार असून थायलॅंडमध्ये लोक ही आवडीनं खातात. याच आइस्क्रीमध्ये व्यक्तीला साप आढळून आला. याचे फोटो त्यानं फेसबुकला शेअर केले. ज्यात बघू शकता की, आइस्क्रीममध्ये एक काळ्या आणि पिवळ्या रंगाचा साप गोठलेला आहे. सापाचं तोंडही स्पष्ट दिसत आहे. फोटो पाहून काही सोशल मीडिया यूजर्सनी अंदाज लावला की, हा एक कमी विषारी गोल्डन ट्री स्नेक (क्रिसोपेलिया ऑर्नाटा) असू शकतो. गोल्डन ट्री स्नेक सामान्यपणे ७० ते १३० सेमीपर्यंत लांब असतात. पण आइस्क्रीममध्ये आढळलेला साप एक पिल्लू होता, जो २० ते ४० सेमी लांब होता.
फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोंवर लोकांनी हजारो कमेंट्स केल्या आहेत. ज्यात लोकांनी हे धक्कादायक आणि चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. तर काही लोकांनी गमतीदार कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं की, "याच कारणानं आम्ही रस्त्यावरील स्टॉलवरून काहीच घेत नाही". तर दुसऱ्यानं लिहिलं की, "ठीक आहे, तुम्हाला आइस्क्रीमसोबत थोडं एक्स्ट्रा प्रोटीन मिळत आहे". तिसऱ्यानं लिहिलं की, "पहिला घास तुम्हाला चांगला लागेल, दुसऱ्या घासानंतर तुम्ही हॉस्पिटलच्या बेडवर असाल".