तब्बल ५८ तास किस करून केला होता वर्ल्ड रेकॉर्ड, आता वेगळं झालं हे फेमस कपल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:18 IST2025-03-05T12:17:57+5:302025-03-05T12:18:22+5:30
Viral News : थायलॅंडमधील एक्काचाई तिरानारात आणि पत्नी लकसाना यांनी २०१३ मध्ये ५८ तास मिनिटांपर्यंत किस करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला होता.

तब्बल ५८ तास किस करून केला होता वर्ल्ड रेकॉर्ड, आता वेगळं झालं हे फेमस कपल!
Viral News : सोशल मीडियावर सध्या एका अशा कपलची चर्चा रंगलीये, जे २०१३ मध्ये सुद्धा सोशल मीडियावर गाजले होते. ही तिच जोडी आहे ज्यांनी १२ वर्षाआधी किसचा असा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता, तो आजपर्यंत कुणीही मोडू शकले नाहीत. थायलॅंडमधील एक्काचाई तिरानारात आणि पत्नी लकसाना यांनी २०१३ मध्ये ५८ तास मिनिटांपर्यंत किस करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. आता ही जोडी वेगळी झाली आहे.
१२ वर्षांनी झाले वेगळे
बीबीसीच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना एक्काचाई यांनी ही माहिती दिली. तसेच त्यांच्या अनोख्या रेकॉर्डचा त्यांना अभिमान असल्याचंही सुद्धा ते म्हणाले. ते म्हणाले की, मला खूप अभिमान वाटतो. हा जीवनात एकदाच येणारा अनुभव होता. आम्ही खूप वर्ष सोबत राहिलो आणि अनेक सुंदर क्षण मला नेहमीच लक्षात ठेवायचे आहेत.
एक्काचाई तिरानारात आणि त्यांची पत्नी लकसाना यांनी १२ वर्षाआधी ५८ तास ३५ मिनिटं सतत किस करत जगभरातील लोकांना अवाक् केलं होतं. २०१३ मध्ये त्यांनी यासंबंधी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. मात्र, हे कपल आता वेगळं झालं आहे.
महत्वाची बाब म्हणजे हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी या कपलला अनेक कठोर नियमांचं पालन करावं लागलं होतं. बाथरूम ब्रेक दरम्यानही त्यांनी किस करणं बंद केलं नव्हतं. आपल्या अनुभवाबाबत त्यांनी सांगितलं की, आम्ही एकमेकांना झोपेपासून वाचण्यासाठी एकमेकांच्या डोक्यावर मारलं. आम्ही मूर्तीसारखे सरळ उभे राहिलो आणि एकमेकांच्या तोंडावाटे पाणी एकमेकांच्या तोंडात टाकलं.
दरम्यान याआधी २०११ मध्ये याच कपलनं ४६ तास २४ मिनिटं सतत किस करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. पुढे दोन वर्षांनी त्यांनी त्यांचा सगळ्यात जास्त वेळ किस करण्याचा रेकॉर्ड मोडला होता.