बोंबला! गाढ झोपेत असलेल्या व्यक्तीच्या बेडवर वरून पडला भलामोठा अजगर आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:31 IST2025-02-20T16:30:37+5:302025-02-20T16:31:43+5:30

Paython On Bed : ही व्यक्ती गाढ झोपेत होती. जेव्हा त्यानं डोळे उघडले तेव्हा त्याची नजर छतावर लटकून असलेल्या अजगरावर पडली.

Terrible python suddenly fell on a sleeping what happen next | बोंबला! गाढ झोपेत असलेल्या व्यक्तीच्या बेडवर वरून पडला भलामोठा अजगर आणि मग...

बोंबला! गाढ झोपेत असलेल्या व्यक्तीच्या बेडवर वरून पडला भलामोठा अजगर आणि मग...

Paython On Bed : विचार करा की, तुम्ही गाढ झोपेत आहात आणि अचानक तुमची नजर छतावर लटकलेल्या अजगराकडे जाते...नक्कीच एखाद्याला हार्ट अटॅक आल्याशिवाय राहणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या क्वींसलॅंडमध्ये एका व्यक्तीसोबत अशीच धक्कादायक घटना घडली. त्याच्या छतावर एक विशाल अजगर लटकून होता आणि तो अचानक तो झोपलेल्या बेडवर येऊन पडला.

ही व्यक्ती गाढ झोपेत होती. जेव्हा त्यानं डोळे उघडले तेव्हा त्याची नजर छतावर लटकून असलेल्या अजगरावर पडली. घाबरून तो बेडवर खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो बाजूला होण्याआधीच अजगर त्याच्या बेडवर येऊन पडला. 
घाबरून घाईघाईत तो रूमबाहेर धावत सुटला आणि रेस्क्यू टीमला माहिती दिली.

रेस्क्यू टीम वेळेत त्याच्या घरी पोहोचली आणि त्यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडलं. सुदैवानं अजगर विषारी नव्हता. पण त्याचा आकार आणि लांबी घाबरवणारी होती.
जेव्हा रेस्क्यू टीम या व्यक्तीच्या घरी पोहोचली तेव्हा अजगर आरामात बेडवर लेटून होता. एक्सपर्टनी सांगितलं की, हा अजगर थंड जागेच्या शोधात छताच्या एखाद्या छिद्रातून रूममध्ये शिरला असेल.

ऑस्ट्रेलियामध्ये अजगर आणि सापांसारखे जीव असे घरात सापडणं काही नवीन नाहीये. खासकरून उन्हाळ्यात हे जीव थंड आणि सावली असलेल्या ठिकाणाच्या शोधात घरांमध्ये शिरतात. मात्र, कुणाच्या बेडवर अशाप्रकारे एखादा अजगर पडणं ही फारच दुर्मीळ घटना आहे.

या घटनेनंतर परिसरातील लोक सतर्क झाले आहेत. एक्सपर्टनी सांगितलं की, जर कधी अशा स्थितीचा सामना झाला तर घाबरण्याऐवजी लगेच रेक्स्यू टीमला माहिती द्यावी. "सनशाइन कोस्ट स्नेक कॅचर" नावाच्या फेसबुक पेजवर या घटनेचे फोटो आणि माहिती शेअर करण्यात आली आहे. 

Web Title: Terrible python suddenly fell on a sleeping what happen next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.