विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका पाहून शिक्षक 'कोमात', तुम्हीही बघून कपाळावर मारून घ्याल हात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 15:08 IST2025-01-17T15:03:41+5:302025-01-17T15:08:37+5:30
Viral Video : अनेकदा काही विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकाही व्हायरल होतात. अशीच एक उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे.

विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका पाहून शिक्षक 'कोमात', तुम्हीही बघून कपाळावर मारून घ्याल हात!
Viral Video : सोशल मीडियाचं विश्व फारच अनोखं आणि नेहमीच अवाक् करणारं आहे. इथे कधी काय बघायला मिळेल काहीच सांगता येत नाही. वेगवेगळे मजेदार फोटो आणि व्हिडिओ यावर व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडीओ अचंबित करणारे तर कधी पोटधरून हसायला भाग पाडणारे असतात. अनेकदा काही विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकाही व्हायरल होतात. अशीच एक उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे.
तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असालच. एखाद्याला मेसेज पाठवायचा असेल तिथे तुम्हाला ऑडिओ मेसेज पाठवण्याचाही पर्याय दिसतो. याद्वारे टाइप करण्याऐवजी तुमच्या आवाजात मेसेज पाठवू शकता. ऑडिओ मेसेज पाठवल्यावर एक फाइल सेंड होते आणि ती प्ले करण्याचा ऑप्शन असते. याचाच वापर एका ड्रामेबाज विद्यार्थ्यानं केला आहे.
पेपरमध्ये या मुलानं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याऐवजी त्यानं उत्तराच्या ठिकाणी ऑडिओ मेसेज बॉक्सचा वापर केला आहे. वेगवेगळ्या उत्तर वेगवेगळे सेकंद लिहिलं आहेत. आता अर्थातच विद्यार्थ्याचं हे उत्तर पाहून शिक्षकानेही त्याला होत जोडले असतील.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ghantaa नावाच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनला लिहिलं आहे की, "एग्झामिनरला स्पीचलेस करून टाकलं". या पोस्टला आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. तर अनेकांनी मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एकानं लिहिलं की, 'तर भावांनो याला म्हणतात हॅकिंग'. दुसऱ्यानं लिहिलं की, 'हा पेंटर आहे'. तिसऱ्यानं लिहिलं की, 'तिसरं उत्तर लांब होतं'.