VIDEO: हंसाच्या जोडप्याचा रोमॅण्टिक डान्स, नेटिझन्स म्हणाले...हीच तर खरी प्रेमाची भाषा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 08:43 IST2022-09-23T08:42:24+5:302022-09-23T08:43:11+5:30

सध्याच्या युगात माणूस आपल्या कामाच्या मागे इतका व्यग्र झाला आहे की जणू तो आयुष्यातील वैयक्तिक क्षण आणि आनंदाला मुकला आहे.

Swan Couple Romantic Dance on social media Netizens Said This Is The Language Of True Love | VIDEO: हंसाच्या जोडप्याचा रोमॅण्टिक डान्स, नेटिझन्स म्हणाले...हीच तर खरी प्रेमाची भाषा!

VIDEO: हंसाच्या जोडप्याचा रोमॅण्टिक डान्स, नेटिझन्स म्हणाले...हीच तर खरी प्रेमाची भाषा!

सध्याच्या युगात माणूस आपल्या कामाच्या मागे इतका व्यग्र झाला आहे की जणू तो आयुष्यातील वैयक्तिक क्षण आणि आनंदाला मुकला आहे. धावपळीच्या जीवनात एखाद्याला दोन क्षण निवांत घालवायचे असतात ज्यातून आपला मूड एकदम ठीक होऊ शकतो. अशाच क्षणांसाठी प्रत्येक जोडपं काहीतरी प्लान करत असतं. मग ते डिनर असो कींवा मग मूव्ही डेट. तर काही जण अगदी त्यांच्या मोकळ्या वेळेत सोशल मीडियावर व्हिडिओ स्क्रोल करुन पाहण्यातही आनंद मानतात. जिथं त्यांना खूप व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ सकारात्मक असतात आणि ते पाहिले की वाह आजच्या दिवसाची सुरुवात एकदम आनंदात झाली अशी भावना निर्माण होते. 

प्रेमाला भाषा नसते आणि सीमा नसते. ही भावना माणसांबरोबरच प्राण्यांनाही सहज समजते. होय, माणूस असो वा प्राणी, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रेम व्यक्त करतो आणि अनुभवतो. आता हा व्हायरल झालेला व्हिडिओच पाहा ना. हंसाची जोडी आनंदी होऊन मनमोहक पद्धतीनं नृत्य करत आहे. हे पाहूनच कुणाचंही मन नक्कीच प्रसन्न होईल. 

व्हिडिओमध्ये एका नदीच्या काठावर दोन हंस दिसत आहेत जे आल्हाददायक वातावरण पाहून खूप आनंदी दिसताहेत. त्यांचा आनंद ते व्यक्त करताना जणू रोमॅण्टिक अंदाजात नृत्य सादर करत आहेत असाच अनुभव येतो. मऊ आणि नाजूक पंख वार्‍याची झुळूक येताच उडताना दिसतात. तर एकमेकांसोबतचं माधुर्य पाहून तुमच्याही चेहऱ्यावर गोड हसू येईल यात शंका नाही. हंसांचे असे व्हिडीओ रील आणि रिअल लाईफमध्ये क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळेच असे मनमोहक व्हिडिओ इंटरनेटवर येताच व्हायरल होतात. @buitengebieden नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

Web Title: Swan Couple Romantic Dance on social media Netizens Said This Is The Language Of True Love