WWE महिला रेसलरने भारतीय पुरुष रेसलरला रिंगमध्ये आपटले, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 16:09 IST2018-10-06T16:06:52+5:302018-10-06T16:09:12+5:30

WWE मध्ये भारतीय रेसलर सुनील सिंह याची एका महिला रेसलरने चांगलीच धुलाई केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Sunil Singh suffers a Bayley to belly WWE mixed match challenge | WWE महिला रेसलरने भारतीय पुरुष रेसलरला रिंगमध्ये आपटले, व्हिडीओ व्हायरल!

WWE महिला रेसलरने भारतीय पुरुष रेसलरला रिंगमध्ये आपटले, व्हिडीओ व्हायरल!

WWE मध्ये भारतीय रेसलर सुनील सिंह याची एका महिला रेसलरने चांगलीच धुलाई केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सुनील यावेळी महिला रेसलरची माफी मागताना दिसतोय, पण तिने त्याला जराही संधी न देता त्याची उचलून दोनदा आपटले. 

झाले असे की, WWE Mixed Match Challenge सुरु होतं. इथे सुनील जोडीदार एलिसियासोबत मॅच खेळण्यासाठी आला होता. स्टाप रेसरल बॅले आणि फिन बेलोर विरुद्ध ही मॅच होती. जेव्हा तो जडोदार रेसलर एलिसियाची मदत करत होता, तेव्हा बॅलेने चलाखीने दुसऱ्या महिला रेसलरला लाथ मारली. त्यामुळे जोडीदार रेसरल एलिसिया सुनीलवर संतापली. कारण दोन महिलांच्या फाईटमध्ये तो आला होता. 

त्यानंतर सुनील सिंह रिंगमध्ये पोहोचला तेव्हा बॅलेने त्याला दोनदा आपटलं आणि बाहेर काढलं. त्यानंतर एलिसियाला सुद्धा तिने बाहेर फेकलं. नंतर फिन बेलोरने हवेत उडी घेत दोघांना लाथ मारली. सध्या व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

Web Title: Sunil Singh suffers a Bayley to belly WWE mixed match challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.