ऊसाचा रस परदेशात बनला लक्झरी ड्रिंक, पाहा यूरोपमध्ये एक ग्लास रसासाठी किती पैसे मोजावे लागतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:11 IST2026-04-05T14:09:28+5:302026-04-05T14:11:48+5:30

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये परदेशातील लोक मोठ्या आवडीने ऊसाचा रस पीत असल्याचे दिसते.

Sugarcane juice becomes luxury drink in Europe Know price of glass | ऊसाचा रस परदेशात बनला लक्झरी ड्रिंक, पाहा यूरोपमध्ये एक ग्लास रसासाठी किती पैसे मोजावे लागतात

ऊसाचा रस परदेशात बनला लक्झरी ड्रिंक, पाहा यूरोपमध्ये एक ग्लास रसासाठी किती पैसे मोजावे लागतात

Viral Video : उन्हात एक ग्लास गारेगार ऊसाचा रस मनाला आणि शरीराला फारच आराम देणारा ठरतो. भारतात रस्त्यावर सहज मिळणारा ऊसाचा रस आपण नेहमी स्वस्तात पितो. म्हणजे कुठे १० रूपये ग्लास तर कुठे २० रूपये ग्लास असा तो मिळतो. पण हाच साधा ऊसाचा रस आता युरोपमध्ये स्टार ड्रिंक बनला आहे, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये परदेशातील लोक मोठ्या आवडीने ऊसाचा रस पीत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे रस काढण्याची पद्धत अगदी देशी आहे. तीच मशीन, तोच अंदाज. पण ग्राहक मात्र पूर्णपणे विदेशी आहेत आणि ते लाईन लावून हा रस घेत आहेत.

भारतात जो रस सहज आणि कमी किमतीत मिळतो, तोच युरोपमध्ये प्रीमियम ड्रिंक बनला आहे. काही रिपोर्ट्सनुसार तिथे एका ग्लाससाठी सुमारे 5 युरो म्हणजेच जवळपास 500–550 रुपये मोजावे लागतात. ही किंमत ऐकून भारतीय युजर्स थक्क झाले आहेत.


काही ठिकाणी तर हा ऊसाचा रस कॉकटेल स्टाईलमध्ये सुद्धा दिला जात आहे. म्हणजेच आपल्या पारंपरिक पेयाला परदेशात एक फॅन्सी टच देऊन अजून आकर्षक बनवले जात आहे. त्यामुळे लोक मजेत म्हणत आहेत, “आपला देशी रस आता इंटरनॅशनल झाला!”

जरी पश्चिमी देशांमध्ये ऊसाचा रस नवीन नसला तरी सध्या तो सोशल मीडियामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. इंस्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून लोकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title : गन्ने का रस: भारत का साधारण पेय यूरोप में बना लग्जरी

Web Summary : भारत में आसानी से मिलने वाला गन्ने का रस यूरोप में लग्जरी बन गया है। एक वायरल वीडियो में विदेशी इसका आनंद लेते हुए दिख रहे हैं, जिसके लिए वे लगभग ₹500-₹550 प्रति गिलास चुका रहे हैं। कुछ जगहें इसे कॉकटेल के रूप में भी पेश कर रही हैं।

Web Title : Sugarcane Juice: Humble Indian Drink Becomes Luxury in Europe

Web Summary : Sugarcane juice, a common and cheap drink in India, has become a luxury in Europe. A viral video shows foreigners enjoying it, paying around ₹500-₹550 per glass. Some places even offer it cocktail-style, adding a fancy touch to the traditional beverage.