सलाम! वाळूशिल्पकाराने 'जबरदस्त कलाकृती' साकारत PM मोदींना दिल्या शुभेच्छा; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 04:21 PM2020-09-17T16:21:37+5:302020-09-17T16:31:34+5:30

ट्विटरवर हा फोटो शेअर करत सुदर्शन पटनाईक यांनी ''हॅप्पी बर्थडे मोदीजी, मिलीअन्स ऑफ ब्लेंसिंग्स विथ यू'' असं कॅप्शन दिलं आहे.

Sudarsan pattnaik wishes pm modi happy birthday with stunning sand art | सलाम! वाळूशिल्पकाराने 'जबरदस्त कलाकृती' साकारत PM मोदींना दिल्या शुभेच्छा; पाहा फोटो

सलाम! वाळूशिल्पकाराने 'जबरदस्त कलाकृती' साकारत PM मोदींना दिल्या शुभेच्छा; पाहा फोटो

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या दिवशी (17 सप्टेंबर) आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाकडूनही वाढदिवसाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 
पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यासाठी उडिसातील पुरी बीच येथे वाळूपासून सुंदर कलाकृती तयार केली आहे. ट्विटरवर हा फोटो शेअर करत सुदर्शन पटनाईक यांनी ''हॅप्पी बर्थडे मोदीजी, मिलीअन्स ऑफ ब्लेंसिंग्स विथ यू'' असं कॅप्शन दिलं आहे.

या  कलाकृतीत तुम्ही पाहू शकता हुबेहूब मोदींचे कुर्ता पायजमा आणि कोट घातलेल्या वेशात शिल्प साकारलं आहे.  “The Pioneer of #AtmaNirbharBharat” at Puri beach in Odisha. #HappyBdayNaModi हा संदेश कॅप्शनमधून दिला आहे. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे.  ८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि १ हजार चारशे लोकांनी या व्हिडीओला रिट्विट केलं आहे. 

मोदींच्या पाच मोठ्या निर्णयांनी देशाची दशा अन् दिशाच बदलली

काश्मीरसाठी कलम 370मध्ये सुधारणा

कलम 370मधील स्वातंत्र्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अजेंड्यावर अव्वल स्थानी होते. 2014मध्येही जेव्हा मोदी सरकार स्थापन झाले तेव्हापासूनच या कामाला प्राधान्य देण्यात येत होते, परंतु तेव्हा ते पूर्ण होऊ शकले नाही. मे 2019मध्ये नरेंद्र मोदी दुस-यांदा पंतप्रधान बनले, त्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी काश्मीरमधून कलम 370 रद्द केले. नरेंद्र मोदींचा हा निर्णय सर्वात ऐतिहासिक होता. या निर्णयामुळे काश्मीरच्या विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला. एवढेच नव्हे तर मोदी सरकारची राजकीय इच्छाशक्ती असल्यानंच त्यांनी जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशात केले.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी

दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या सात महिन्यांत मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेत सर्वांना आश्चर्यचकित केले. हा निर्णय नागरिकता दुरुस्ती कायदा मंजूर करण्याचा होता. नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याकांना भारतातील नागरिकत्वाचा हक्क मिळाला. याचा अर्थ हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि या देशांचे ख्रिश्चन ज्यांना वर्षानुवर्षे निर्वासितांचे जीवन जगण्यास भाग पाडले गेले होते. त्यांना भारताचे नागरिकत्व मिळवण्याचा अधिकार आला.

अयोध्या वादाचा शेवट

देशातील सर्वात मोठा कायदेशीर वाद म्हणजे अयोध्या वादही मोदी सरकारच्या काळातच मिटविला गेला. भगवान राम वर्षानुवर्षे कोर्टाच्या कारवाईत अडकले होते, त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला. 9 नोव्हेंबर 2019ला सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाने रामजन्मभूमीला अयोध्येत राम जन्मस्थान मानले.

तीन तलाकचा खेळ संपुष्टात

पंतप्रधान मोदींनी मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकच्या काळ्या प्रथेपासून मुक्ती दिली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने संसदेमधून तिहेरी तलाक कायदा मंजूर करून मुस्लिम महिलांना मोठा न्याय दिला. असे म्हणतात की, पीएम मोदी यांनी हा कायदा संमत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि देशात असे वातावरण तयार केले की हा कायदा संमत करण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

गरीब आणि सवर्णांसाठी १०% आरक्षणाची तरतूद

देशाच्या आरक्षणाच्या व्यवस्थेत फेरफार करणे पंतप्रधानांसाठी सोपे काम नव्हते. इतिहास साक्षीदार आहे की, जेव्हा आरक्षणामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा सरकारची खुर्ची गेली आहे. असे असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र सरकारने तो प्रश्न कायदेशीर पद्धतीनं मार्गीही लावला. लोकसभा आणि राज्यसभेतील गरीब आणि सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला. आता गरीब आणि सवर्णांना नोकरीपासून शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशापर्यंत 10 टक्के आरक्षणाचा लाभ मिळू लागला आहे. हे 5 निर्णय होते ज्यांनी देशाची दशा आणि दिशा बदलली, त्यामुळे देशात मोठे बदल झाले आहेत.  

हे पण वाचा-

बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ

लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...

Web Title: Sudarsan pattnaik wishes pm modi happy birthday with stunning sand art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.