आजकाल लहान मुलांना स्टायलिश लंच बॉक्ससोबतच चविष्ट जेवण हवं असतं. फॅन्सी लंच बॉक्स हवा असतो. बाजारातही विविध प्रकारचे आकर्षक रंगीबेरंगी लंच बॉक्स मिळतात. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा आयफोनच्या बॉक्सला आपला लंच बॉक्स बनवून शाळेत घेऊन जात गेल्याचं दिसत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, एक मुलगा आयफोन बॉक्समध्ये जेवण घेऊन त्याच्या शाळेत पोहोचला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जेव्हा मुलाच्या शिक्षिकेने त्याला विचारलं की, हे काय घेऊन आला आहेस, तेव्हा त्याने सांगितलं की बॉक्समध्ये दुपारचं जेवण म्हणून त्याने पराठा आणला आहे.
आयफोनच्या बॉक्समध्ये लंच आणल्याने शिक्षिकाही हैराण झाली. तिला मुलाच्या कृतीमुळे आश्चर्य वाटलं. शिक्षिकेने विद्यार्थ्याला विचारलं की, हा लंच कोणी पॅक केला आहे, तेव्हा मुलाने उत्तर दिले की त्याने स्वतःच हे पॅक केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक युजर्सनी शेअर केला आहे. लोक आता हा व्हिडीओ लाईक करत असून शेअर करत आहेत.
Web Summary : A boy surprised his teacher by bringing lunch to school in an iPhone box. The box contained a paratha, which the boy packed himself, leaving the teacher amused and amazed by his ingenuity.
Web Summary : एक लड़के ने आईफोन के डिब्बे में स्कूल में लंच लाकर अपनी टीचर को चौंका दिया। डिब्बे में पराठा था, जिसे लड़के ने खुद पैक किया था, जिससे टीचर उसकी चतुराई देखकर हैरान रह गईं।