शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO:शाळेची दुरावस्था! मुलांना वर्गात चक्क छत्री घेऊन बसण्याची आली वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 18:09 IST

मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील एका शाळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सिवनी : मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील एका शाळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाळेची दुरावस्था पाहायला मिळत आहे. कारण शाळेतील मुले वर्गात चक्क छत्री घेऊन बसली आहेत. शाळेची स्थिती एवढी वाईट झाली आहे की ठिकठिकाणी पाणी गळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना पाण्यापासून वाचवण्यासाठी छत्रीचा सहारा घ्यावा लागत आहे. अशा दुरावस्थेत विद्यार्थी कसे अभ्यास करणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

दरम्यान, सोशल मीडियावरून प्रशासनाचा कारभार उघड करणारी ही व्हिडीओ सिवनी जिल्ह्यातील घनसौर येथील आहे. तिथे कार्यरत असलेल्या शिक्षकांचे म्हणणे आहे की, पावसाळ्यात शाळेत पाणी गळते म्हणून मोठ्या प्रमाणात मुलं शाळेकडे पाठ दाखवतात. तसेच जी मुलं शाळेत येतात त्यांना सोबत छत्री घेऊन बसावे लागत आहे. शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी मे महिन्यात संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती मात्र अद्याप कोणताच बदल झालेला नाही. 

 

कॉंग्रेसने सरकारवर साधला निशाणा कॉंग्रेसने हा व्हिडीओ शेअर करून शिवराज सिंग चौहान सरकारवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचे मीडिया समन्वयक नरेंद्र सलूजा यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. "मध्य प्रदेशमधील शिवराज सरकारमध्ये एकीकडे अत्याधुनिक सीएम रायझ स्कूलने मोठे दावे केले आहेत तर दुसरीकडे छतावरून पाणी गळत आहे म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत छत्री घेऊन अभ्यास करावा लागत आहे. राज्यातील सिवनी जिल्ह्यातील खैरिकाला गावातील प्राथमिक शाळेची दुरावस्था. हे शिवराज सरकारचे वास्तव आहे," अशा शब्दांत त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानSchoolशाळाTwitterट्विटर