शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO:शाळेत वेळेवर न आल्याने विद्यार्थी करतायत शौचालय साफ, पाहा धक्कादायक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 14:38 IST

कर्नाटक राज्यातील गडग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गडग : कर्नाटक राज्यातील गडग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण इथे एका सरकारी शाळेतील विद्यार्थी उशिरा शाळेत पोहचल्याने त्यांना चक्क शौचालय साफ करावे लागत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शाळेतील कूक विजयलक्ष्मी चलावडी यांनी हा व्हिडीओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला होता. नागवी, गडग येथील शासकीय प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील ही घटना असल्याचे उघड झाले आहे. 

शौचालय साफ करण्याची दिली शिक्षा शाळेतील प्रशासनाने विद्यार्थी वेळेवर शाळेत न आल्याने त्यांना शौचालय साफ करण्यास लावले असा आरोप विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी केला. शिक्षण विभाग घटनेची कसून चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शाळेतील कूक विजयलक्ष्मी यांनी सांगितले, "जेव्हा मी शाळेत होतो, तेव्हा विद्यार्थ्यांनी शौचालय साफ करण्यासाठी माझ्याकडून झाडू आणि बादली मागितली. विद्यार्थ्यीं म्हणत होते की असे करायला शिक्षकांनी सांगितले आहे. तेव्हा मला वाटले की हे बरोबर नाही म्हणून मी याचा व्हिडीओ काढला आणि व्हॉट्सॲपवर शेअर केला."

व्हिडीओ व्हायरल होताच दिले चौकशीचे आदेशदरम्यान, विद्यार्थी शौचालय साफ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच कूकला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रागाचा सामना करावा लागला. ही व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील युजर्स चांगलेच संतापले असून शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तर ही एक सरकारी शाळा असल्यामुळे अशी घटना घडली असल्याचे काहींचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलKarnatakकर्नाटकGovernmentसरकारSchoolशाळाStudentविद्यार्थी