कितने तेजस्वी लोग है! कॉलेजच्या अर्जावर मोबाईल नंबर ऐवजी लिहिला फोनच्या मॉडेलचा नंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 16:24 IST2022-07-07T16:18:25+5:302022-07-07T16:24:04+5:30
साधारणत: एखादा अर्ज भरताना स्पेलिंग मिस्टेक होणं हाच एखादवेळेस घोळ असू शकतो पण एका महारथीनं असा काही घोळ घातलाय जो वाचून तुम्ही पोट धरुन हसाल.

कितने तेजस्वी लोग है! कॉलेजच्या अर्जावर मोबाईल नंबर ऐवजी लिहिला फोनच्या मॉडेलचा नंबर
कॉलेजमध्ये नवीन अॅडमिशन घ्यायच्यावेळी विद्यार्थ्यांना अर्ज व्यवस्थित अन् सुवाच्च अक्षरात भरावा लागतो. आपण जे लिहितोय त्याची माहिती व्यवस्थित आहे ना याची आपण वारंवार खात्री करुन घेतो. कोणतीही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याबाबतही आपण सतर्क असतो. पण समजा यात काही घोळ झाला तर! साधारणत: स्पेलिंग मिस्टेक होणं हाच एखादवेळेस घोळ असू शकतो पण एका महारथीनं असा काही घोळ घातलाय जो वाचून तुम्ही पोट धरुन हसाल.
मलेशियामधील एका विद्यार्थ्याने कॉलेजमधील कोर्सची चौकशी करण्यासाठी दिलेल्या अर्जाच मोबाईल नंबर ऐवजी चक्क मोबाईलच्य मॉडेलचा नंबर टाकला आहे. त्याच्या अर्जात मोबाईल नंबर या रकान्यात त्याने iphone 6 plus असं लिहिलंय.
लावलात ना डोक्याला हात? नेटकऱ्यांचीही हीच अवस्था आहे. हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेक नेटकरी या फोटोवर भन्नाट कमेंट टाकून या विद्यार्थ्याच्या वेंधळेपणाची मजा घेत आहेत. एकाने लिहिलंय, 'कधीही घाई करु नका', तर दुसरा म्हणतोय 'काय आऊट ऑफ द बॉक्स विचार केलाय'. तुम्हीही कोणताही अर्ज भरताना अशी घाई करु नका नाहीतर तुमच्यावरही हिच वेळ येईल जी या फॉर्म भरणाऱ्या मुलावर आलीयं.