Statue of Liberty Video: वादळाचा तडाखा अन् सात मजली उंचीचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:13 IST2025-12-16T12:10:48+5:302025-12-16T12:13:57+5:30
Statue of Liberty Collapses: सात मजली इमारती इतका उंच असलेला भलामोठी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Statue of Liberty Video: वादळाचा तडाखा अन् सात मजली उंचीचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोसळला
Statue of Liberty Collapse Brazil Video: ब्राझीलच्या रियो ग्रांडे डो सुलमधील गुआईबामध्ये उभारण्यात आलेल्या भल्यामोठ्या स्ट्रॅच्यू ऑफ लिबर्टीला वादळाचा तडाखा बसला. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीप्रमाणे प्रतिकृती ब्राझीलमध्ये उभारण्यात आली होती. सात मजली इमारती इतकी उंची असलेला हा पुतळा कोसळला.
वादळ आल्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हळूहळू एका बाजूला झुकायला लागली. त्यावेळी अनेक लोकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडीओ बनवला. स्टॅच्यू कोसळतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोसळतानाचा व्हिडीओ
वादळामुळे सगळीकडे धूळ उडत आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हळूहळू एका बाजूला झुकत जातो आणि नंतर खाली कोसळतो. खाली पडल्यानंतर पुतळा पूर्णपणे मोडला आहे.
Another view of the Statue of Havana in Guaíba, in Brazil’s Porto Alegre metropolitan region, being toppled today by strong wind gusts. pic.twitter.com/dzzywxHExh
— Volcaholic 🌋 (@volcaholic1) December 15, 2025
ब्राझीलमध्ये घडलेल्या घटनेनंतर वाऱ्याचा वेग असा किती होता, असा प्रश्नही अनेकांना पडला. ब्राझीलच्या डेफेसा सिव्हील एजन्सीनुसार, शहराला आधीच वादळाचा इशारा दिला गेला होता. त्याकाळात वाऱ्याचा वेग ताशी ९० किमीपेक्षा जास्त होता.
ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी २०२० मध्ये उभारण्यात आली होती. स्टॅच्यू ११ मीटर उंच ओट्यावर बसवण्यात आला होता. स्टॅच्यू कोसळत असताना दिसल्यानंतर परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.