जुगाडू बाईकवाला! पठ्ठ्यानं Splendor बाइकला लावले तीन टायर, लोक म्हणाले...हीच खरी सुपर स्प्लेंडर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 21:54 IST2023-03-21T21:52:19+5:302023-03-21T21:54:33+5:30
Bike Jugaad Viral Video On Instagram: बॉलीवूड सिनेमात आपण चार सीटर जुगाडू बाईक पाहिलीच आहे. अभिनेता अजय देवगनच्या गोलमाल सिनेमात ...

जुगाडू बाईकवाला! पठ्ठ्यानं Splendor बाइकला लावले तीन टायर, लोक म्हणाले...हीच खरी सुपर स्प्लेंडर
Bike Jugaad Viral Video On Instagram: बॉलीवूड सिनेमात आपण चार सीटर जुगाडू बाईक पाहिलीच आहे. अभिनेता अजय देवगनच्या गोलमाल सिनेमात आपण तीन चाकी बाईक पाहिलीय. ज्यावर अजय देवगण, शरमन जोशी, अर्शद वारसी आणि तुषार कपूर यांना एकाच बाईकवर प्रवास करताना पाहिलं होतं. आता एका तरुणानं हिरोच्या स्प्लेंडर बाईकला मॉडिफाय करत तिला तिसरा टायर जोडला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे.
पठ्ठ्यानं केलेला जुगाड पाहून लोकही अवाक् झालेत. तर काहींनी हे धोकादायक असून नियमाच्या विरोधात असल्याच्याही कमेंट्स केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर नवीन बाइक १६५ नावाच्या अकाऊंटवरुन (no_1_naveen_bike_165) जुगाडू बाईकचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओला तब्बल १० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळालेत तर ६ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. शेकडो यूझर्सनं कमेंट्सही केल्या आहेत. कुणी हा पठ्ठ्या अशीच रेल्वे देखील डिझाइन करू शकतो असं म्हटलं आहे. तर कुणी आणखी एक टायर जोडला असता तर भावानं चारचाकी कार बनवली असती असं म्हटलंय. आणखी एकानं तर हिच खरी सुपर स्प्लेंडर बाइक असल्याचं म्हटलं आहे. अनेकांना ही जुगाडू बाईक पाहून बॉलीवूडच्या गोलमाल सिनेमाचीच आठवण झाली आहे.
असा बसवला तिसरा टायर...
अशी दिसते सुपर स्प्लेंडर...