१० वी च्या विद्यार्थ्यानं सोनू सूदकडे मागितला व्हिडीओ गेम; तेव्हा सोनू म्हणाला.... पाहा व्हायरल ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 01:54 PM2020-08-07T13:54:21+5:302020-08-07T19:40:58+5:30

देशातील जवळपास प्रत्येक कानाकोपऱ्यातून सोनू सूदकडे मदतीची मागणी झाली आणि त्यानं जवळपास प्रत्येकाला मदत केली.

Sonu sood reaction to teen asking for ps4 twitter users loved it | १० वी च्या विद्यार्थ्यानं सोनू सूदकडे मागितला व्हिडीओ गेम; तेव्हा सोनू म्हणाला.... पाहा व्हायरल ट्वीट

१० वी च्या विद्यार्थ्यानं सोनू सूदकडे मागितला व्हिडीओ गेम; तेव्हा सोनू म्हणाला.... पाहा व्हायरल ट्वीट

googlenewsNext

कोरोनाच्या माहामारीने देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अनेक प्रवासी कामगारांना गैरसोयीचा सामना करावा लागला. देशात  लॉकडाऊनमुळे  अडकलेल्या लोकांना अभिनेता सोनू सूद यानं मदतीचा हात दिला. शेकडो कुटुंबाना सोनूनं आर्थिक मदत सुद्धा केली आहे. देशातील जवळपास प्रत्येक कानाकोपऱ्यातून सोनू सूदकडे मदतीची मागणी झाली आणि त्यानं जवळपास प्रत्येकाला मदत केली. काही दिवसांपूर्वी परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही सोनू सूदनं मदत केली आहे. रशियात अडकलेल्या 101 वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदनं विमानाची सोय केली आणि ते मायदेशात परतले.

सोशल मीडियावर सोनू सूद मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. अशात एका १० वी च्या मुलाने ट्विटरवर सोनू सूदकडे अशी  ृकाही मागणी केली आहे. ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. एका चिुमरड्याने सोशल मीडियावर सोनू सूदकडे प्ले स्टेशन 4 (PS4) या व्हिडीओ गेमची मागणी केली आहे.  अशी मागणी केल्यानंतर सोनूनं गमतीदार उत्तर दिलं आहे. मागणी करणारा हा १० वी चा विद्यार्थी आहे.

या विद्यार्थ्यानं ट्विट केलं आहे  की, "प्लीज सर तुम्ही मला पीएस 4  देऊ शकता का? माझ्या आजूबाजूचे सर्वच मित्रमैत्रीणी व्हिडीओ गेम खेळून  लॉकडाऊनचा आनंद घेत आहेत. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याची मागणी पूर्ण करण्याऐवजी सोनूनं भारीच उत्तर दिलं आहे. व्हिडीओ गेम ऐवजी पुस्तकं घेऊन देण्याचं सोनूनं म्हटलं आहे. सोनूचं हे ट्वीट खूपच व्हायरल होत आहे. हे ट्वीट त्यांनी ६ ऑगस्टला पोस्ट केलं होतं. या ट्वीटला आतापर्यंत ३७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. अभिनेता करणवीर बोहरा यांनी सोनूचं कौतुक केलं आहे. 

हे पण वाचा :

हिरवं सोनं आहे बांबूची शेती, कोट्यधीश झालेत लोक, सरकारही देत आहे सब्सिडी!

कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी

लय भारी! शेतकऱ्यानं केली कमाल; घराच्या छतावर फुलवली ४० प्रकारच्या आंब्याची बाग

Web Title: Sonu sood reaction to teen asking for ps4 twitter users loved it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.