Video : भाजपाच्या महिला उमेदवाराचे 'टिक-टॉक' पाहून 'डिपॉझिटच जप्त' होईल ना भाऊ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 16:56 IST2019-10-03T16:54:47+5:302019-10-03T16:56:49+5:30
Vidhan Sabha Election 2019 : भाजपाच्या या महिला उमेदवाराची चर्चा टिकटॉकसोबत फेसबुकवरही रंगली असून त्यांच्या फॅन्समध्ये आणखी भर पडत आहे.

Video : भाजपाच्या महिला उमेदवाराचे 'टिक-टॉक' पाहून 'डिपॉझिटच जप्त' होईल ना भाऊ!
महाराष्ट्रासोबतच हरयाणाविधानसभेची देखील निवडणूक होणार आहे. इथे २१ ऑक्टोबर मतदान होणार असून २४ तारखेला निकाल जाहीर होणार आहे. इथे भाजपाकडून आमदपूर जागेवरून नेत्या सोनाली फोगाट मैदानात आहेत. जसं त्यांना तिकीट जाहीर झालं त्यांचे टिकटॉक फॉलोअर्स अचानक वाढू लागलेत. चला जाणून घेऊ कोण आहेत सोनाली फोगाट आणि बघू त्यांचे व्हिडीओ....
ही बातमी लिहून होईपर्यंत त्यांचे टिकटॉकवर १ लाख १९ हजार फॉलोअर्स होते.
सोनाली फोगाट यांनी हरयाणाभाजपा महिला मोर्चासोबत काम केलं आहे.
इतकेच नाही तर त्या राज्य भाजपाच्या नॅशनल एक्झीक्यूटीव्ह मेंबरही राहिल्या आहेत.
सोनाली जेवढ्या सिरीअसली टिकटॉक व्हिडीओ करतात, तेवढ्याच सिरीअसली त्या फेसबुक लाइव्ह सुद्धा करतात.
कामाचं काही असो सोनाली फोगाट यांना टिकटॉक व्हिडीओचा लोकप्रियतेसाठी नक्कीच फायदा होतो आहे.