बाबा सतत म्हणायचे पास व्हा...आता त्यांचीच 10वी ची मार्कशीट सापडली, एकदा बघाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 14:34 IST2024-04-23T14:32:13+5:302024-04-23T14:34:49+5:30
व्हायरल व्हिडीओत मुलगा सांगत आहे की, वडील त्याला पास होण्यासाठी सतत रागवत होते. आता मला त्यांचीच 10वी ची मार्कशीट सापडली आहे.

बाबा सतत म्हणायचे पास व्हा...आता त्यांचीच 10वी ची मार्कशीट सापडली, एकदा बघाच...
सोशल मीडियावर नेहमीच काही मजेदार आणि नवीन गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या उत्तरपत्रिका आणि मार्कशीट व्हायरल होण्याचा नवा ट्रेंड सुरू झालाय. यातच सोशल मीडियावर एक मार्कशीट व्हायरल होत आहे. व्हायरल झालेली ही 10वी मार्कशीट एक X यूजरने शेअर केली आहे. या कॅप्शनला लिहिण्यात आलं आहे की, माझ्या वडिलांची मार्कशीट सापडली. व्हायरल व्हिडीओत मुलगा सांगत आहे की, वडील त्याला पास होण्यासाठी सतत रागवत होते. आता मला त्यांचीच 10वी ची मार्कशीट सापडली आहे. तो व्हिडीओत पुढे जे बोलतो ते ऐकून लोक पोटधरून हसत आहेत.
व्हिडीओत मार्कशीट आणि मीम्स सोबतच एका तरूणाचा आवाजही ऐकू येत आहे. तो सांगत आहे की, आमचे वडील आम्हाला खूप रागावत होते की, पास व्हा, पास व्हा....आता हे बघा 10वीत जेवढे विषय होते त्या सगळ्यांमध्ये ते फेल झाला होते. त्यांची मार्कशीट बघा.
Pitaji ki marksheet mil gayi 😂 pic.twitter.com/3dXn0yKJh1
— Desi Bhayo (@desi_bhayo88) April 19, 2024
हा व्हायरल व्हिडीओ @desi_bhayo88 नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 4 लाख 12 हजार वेळ बघण्यात आला आहे आणि साडे चार हजार लोकांनी लाइक केला आहे. इतकंच नाही तर या व्हिडीओत लोकांनी अनेक मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिलं की, म्हणून तुला ते म्हणत आहे की, पास व्हा..दुसऱ्याने लिहिलं की, वडिलांची मार्कशीट व्हायरल करून काय होणार? तेही फेल झाले होते म्हणून तुही फेल होणार का?