बाबो! सोशल डिस्टेंसिंगसाठी हळद लावण्याचा 'जुगाड' पाहून पोट धरून हसाल; पाहा व्हिडीओ
By Manali.bagul | Updated: September 28, 2020 17:29 IST2020-09-28T17:28:58+5:302020-09-28T17:29:51+5:30
अनेकजणांना हा व्हिडीओ पाहून हसू अनावर झालं आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता हळद लावण्यासाठी या मुलीच्या मैत्रीणी पेंट रोलर ब्रशचा वापर करत आहे.

बाबो! सोशल डिस्टेंसिंगसाठी हळद लावण्याचा 'जुगाड' पाहून पोट धरून हसाल; पाहा व्हिडीओ
कोरोना व्हायरसनं गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून कहर केला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे अचानक लॉकडाऊन झाल्यानं सारं काही थप्प पडलं. त्यामुळे लोकांनी लग्न समारंभ किंवा मे, एप्रिल दरम्यान ठरवलेले कार्यक्रम पुढे ढकलले होते. अनेकांनी तर शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सचं पालन करत आपापल्या घरातील सोहळे पार पाडले. पण कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत नाहीये. त्यामुळे लोकांनी अनेक महिन्यांनंतर आता कोरोनासोबत जगायला सुरूवात केली आहे.
Social distancing Haldi ceremony. 🤣🤣 pic.twitter.com/OPa7zA6hid
— payal bhayana 🇮🇳 (@payalbhayana) September 26, 2020
दरम्यान सोशल मीडियावर लॉकडाऊनचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका हळदीच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. असा हळदीचा कार्यक्रम तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. सोशल डिस्टेंसिंग पाळून हळद लावण्यासाठी असा जुगाड करण्यात आला आहे. अनेकजणांना हा व्हिडीओ पाहून हसू अनावर झालं आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता हळद लावण्यासाठी या मुलीच्या मैत्रीणी पेंट रोलर ब्रशचा वापर करत आहे.
या रोलर ब्रशनं हळद लावून घेताना या मुलीला हसू अनावर झालं आहे. हळदीत रोलर ब्रश बुडवून पायांना हळद लावली जात आहे. ट्विटर युजर पायल भयाना यांनी हा व्हिडीओ २६ सप्टेंबरला सोशल मीडियावर शेअर केला होता. सोशल डिस्टेंसिंग हळदीचा कार्यक्रम असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. हा जुगाड नेटिझन्सना खूप आवडला आहे. आतापर्यंत ५९ हजार पेक्षा हा व्हिडीओ पाहिला गेला असून २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.
हे पण वाचा-
बापरे! नारळाच्या झाडावर चढलेल्या माणसाची करामत पाहून उडेल थरकाप; पाहा व्हिडीओ
अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार
काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ
Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'