बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:43 IST2025-10-16T12:43:12+5:302025-10-16T12:43:46+5:30
महामार्गावर अपघात होणं ही काही नवी गोष्ट नाही. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून कोणाचाही थरकाप उडेल.

बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
महामार्गावर अपघात होणं ही काही नवी गोष्ट नाही. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून कोणाचाही थरकाप उडेल. या व्हिडीओमध्ये हायवेवर एकामागोमाग एक अशा अनेक गाड्या एकमेकांवर धडकतांना दिसत आहेत. काही क्षणांतच रस्त्यावर गाड्यांचा ढिग साचलेला आणि गाड्या एकमेकांवर चढलेल्या दिसतात. हा भयानक अपघात पाहून लोकांनी सुरक्षित ड्रायव्हिंगचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रात्रीच्या वेळी महामार्गावर अनेक गाड्या थांबलेल्या दिसत आहेत. मागून एक भरधाव वेगाने येणारी कार समोरच्या गाडीला धडकते. यानंतर अपघात मालिकाच सुरू होते. एकामागून एक गाड्या वेगाने येतात आणि पुढे थांबलेल्या गाड्यांवर धडकत जातात. सर्वात शेवटी एक मोठा ट्रक येतो आणि तो अनेक गाड्यांना आपल्या कचाट्यात ओढतो. हा सर्व प्रकार काही सेकंदांत घडतो आणि महामार्गावर डझनभर गाड्यांचे नुकसान होते.
जुन्या अपघाताचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल
ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'CommanderEagle' नावाच्या आयडीवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एक मिनिटाचा हा व्हिडीओ आतापर्यंत ६० लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि ५० हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे.
My God that is hard to look away from 😳 pic.twitter.com/9Sotk1CjiB
— RedWhite&Right (@_CommanderEagle) October 14, 2025
वास्तविक, हा व्हिडीओ एका जुन्या अपघाताचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. २०२०-२०२१ मध्ये हिवाळ्यातील वादळामुळे रस्त्यावर बर्फ जमा झाला होता, ज्यामुळे रस्त्यावर प्रचंड घसरण झाली होती. याच कारणामुळे १३० हून अधिक गाड्या घसरून एकमेकांवर आदळल्या होत्या, ज्यात ६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक लोक जखमी झाले होते.
नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया
हा भयानक अपघात पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, "असे अपघात फक्त एका चुकीमुळे होतात आणि ती म्हणजे 'भरधाव वेग'." तर दुसऱ्याने म्हटले, "जोपर्यंत लोक वाहतूक नियमांना थट्टा समजतील, तोपर्यंत असे अपघात होत राहतील." सुरक्षित ड्रायव्हिंगचे महत्त्व अशा घटनांमधूनच समजते, अशा भावना अनेक युजर्सनी व्यक्त केल्या आहेत.