शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

स्नेक मॅनचा Live Video! जगातील सर्वात चपळ अन् विषारी साप Black Mamba ला पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 1:22 PM

World's Fastest Snakes, Black Mamba : ब्लॅक मांबा एवढा विषारी आहे की, त्याच्या विषाचे दोन थेंब जरी मानवी शरिरात गेले तर तो व्यक्ती पाणीदेखील मागण्याच्या स्थितीत राहत नाही.

डर्बन: स्नेक मॅनच्या (Snake Man) नावाने प्रसिद्ध असलेल्या दक्षिण ऑफ्रिकेच्या डर्बन शहरातील अर्नॉल्डने एक खतरनाक धाडस केले आहे. अर्नॉल्डने जगातील सर्वात चपळ असलेला आणि अती विषारी सापांच्या यादीत असलेल्या ब्लॅक मांबाला (World's Fastest Snakes, Black Mamba) पकडले आहे. एवढेच नाही तर या घटनेचा खतरनाक व्हिडीओ त्याने जगासाठी लाईव्ह केला आहे. त्याच्या हातातील साप हा सहा फूट लांबीचा आहे. (Jason Arnold, a Durban-based snake catcher Catches One of World's Fastest Snakes, Black Mamba.)

ब्लॅक मांबा एवढा विषारी आहे की, त्याच्या विषाचे दोन थेंब जरी मानवी शरिरात गेले तर तो व्यक्ती पाणीदेखील मागण्याच्या स्थितीत राहत नाही. लगेचच त्याचा मृत्यू होतो. ब्लॅक मांबा हा जगातील सर्वात चपळ असलेल्या सापांपैकी एक आहे. तो जवळपास ताशी २० किमीच्या वेगाने पळू शकतो. अर्नाल्‍डचा हा व्हिडीओ डाला यू क्रू ग्रुपने शेअर केला आहे. हा ग्रुप संजीव सिंह यांनी सुरु केला आहे. 

फेसबुकवर हा व्हिडीओ चार लाख वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओमध्ये साप घराबाहेरील गार्डनमध्ये लपल्याचे दिसत आहे. ब्लॅक मांबा दिसल्यानंतर तेथील स्थानिकांनी अर्नाल्डला सापाला पकडण्यासाठी बोलावले. ब्लॅकत मांबाला पकडणे खूप कठीण असते. एक फुटाच्या विशिष्ट काठीने अर्नाल्डने सापाला पकडले. जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक असलेला हा ब्लॅक मांबा तसा भित्रा असतो, मात्र त्याला राग आला की तो असे वार करतो की पाहून भयकंप उडेल. ब्लॅक मांबा हे नाव एकून तो काळा असेल असे वाटले असेल. तसे नाहीय. तो थोडा हिरव्या रंगाचा असतो, फक्त त्याचे तोंड (आतील भाग) काळ्या रंगाचे असते. यामुळेच या सापाचे नाव ब्लॅक मांबा पडले आहे. 

टॅग्स :snakeसापSouth Africaद. आफ्रिकाSocial Viralसोशल व्हायरल