सापाने इतकं मोठं अंड गिळलं की, बघून विश्वासही बसणार नाही, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 14:40 IST2022-06-14T14:38:20+5:302022-06-14T14:40:14+5:30
Snake Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक सापाचा हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेचर ओके नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे.

सापाने इतकं मोठं अंड गिळलं की, बघून विश्वासही बसणार नाही, व्हिडीओ व्हायरल
Snake Viral Video : साप टीव्हीमध्ये दिसो किंवा प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यात दिसो. त्यांना बघून भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यांना बघून भीती वाटणं योग्यच आहे. साप दुरूनही दिसला तरी लोक घामाघुम होतात. काही साप हे विषारी असण्यासोबतच त्यांचं तोंडही मोठं असतं. आकाराने तोंड लहान दिसत असलं तरी ते मोठाले प्राणी गिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर एक सापाचा हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेचर ओके नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक चक्रावले आहेत. या व्हिडीओत एका सापाने आपल्या तोंडाच्या आकारापेक्षा मोठं अंड गिळलं आहे.
व्हिडीओत बारीक पण खतरनाक दिसणारा साप सरपटत दोन अंड्यांजवळ पोहोचतो आणि त्यातील एका अंड्यावर आपलं तोंड लावतो. हळूहळू तो अंड गिळण्याचा प्रयत्न करतो. अंड तर त्याच्या तोंडापेक्षा अधिक मोठं आहे. अशात सुरूवातीला बघून तर असंच वाटतं की, तो अंड गिळू शकणार नाही. पण कसंतरी तो ते अंड तोंडात टाकतो. अचानक त्याचं तोंड अंड्यापेक्षा मोठं होतं आणि पूर्ण अंड आत जातं.
या व्हिडीओला आतापर्यंत 55 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक भरभरून या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. एक महिला तर व्हिडीओ पाहून चांगलीच घाबरली आणि तिने कमेंट केली की, तिने हा व्हिडीओ बघायलाच नको होता. एका व्यक्तीने लिहिलं की, त्याला माहितच नव्हतं की, सापाचं तोंड इतकं मोठं असतं.