रस्त्यावरच साप-कावळ्याचं 'द्वंद्वयुद्ध'! कोण हरलं, कोण जिंकलं? बघा थरारक VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 18:29 IST2025-04-14T18:28:01+5:302025-04-14T18:29:02+5:30

या व्हडिओमध्ये एक कावळा आणि साप एकमेकांशी लढताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांवर हल्ले करताना दिसत आहेत. 

Snake-crow fight on the road Who lost, who won Watch the thrilling VIDEO | रस्त्यावरच साप-कावळ्याचं 'द्वंद्वयुद्ध'! कोण हरलं, कोण जिंकलं? बघा थरारक VIDEO

रस्त्यावरच साप-कावळ्याचं 'द्वंद्वयुद्ध'! कोण हरलं, कोण जिंकलं? बघा थरारक VIDEO

आपण साप आणि मुंगसाची लढाई अथवा साप आणि मांजराची झुंज बघितली किंवा ऐकली तरी नक्कीच असेल. पण आपण कधी कावळा आणि सापाचे द्वंद्वयुद्ध बघितले आहे? असे दृश्य क्वचितच कुणी यापूर्वी बघितले असेल. आज आम्ही आपल्यासाठी असाच एक थरारक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. या व्हडिओमध्ये एक कावळा आणि साप एकमेकांशी लढताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांवर हल्ले करताना दिसत आहेत. 

कोण जिंकलं कोण हरलं? -
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक कावळा आणि साप समोरा-समोर दिसत आहेत. यात कावळ आपल्य चोचीने त्या सापावर सातत्याने हल्ला करत आहे. दरम्यान, साप कावळ्यापासून स्वतःचा बचाव करताना दिसत आहे. मात्र त्याला कावळ्याचे वार जेव्हा असह्य होऊ लागतात, जेव्हा तो कावळ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीही कावळा त्याला सोडण्यास तयार नाही. तो त्याच्या चोचीने सापावर वारंवार वार करताना दिसत आहे. हे युद्ध साधारणणे १ तास चालले. अखेर, कावळ्याने सापाला संपवले.

साप आणि कावळ्याच्या या झुंजीचा हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील रेऊसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डेल्हा गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित साप कावळ्याच्या घरट्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, कावळ्याने सापाला बघितले आणि त्या सापावर हल्ला केला आणि त्याला मारले. 


 

Web Title: Snake-crow fight on the road Who lost, who won Watch the thrilling VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.