VIDEO : इंडक्शनच्या मागे लपला होता साप, फणा काढून बाहेर आला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 15:57 IST2024-07-30T15:56:34+5:302024-07-30T15:57:26+5:30

Snake Video : कधी गाडीच्या सीटखाली तर कधी एखाद्या कारच्या बोनटमध्ये साप लपलेले असतात. असाच एक साप एका घरात इंडक्शनच्या मागे फणा काढून बसलेला आढळून आला.

Snake came out behind from the induction watch video | VIDEO : इंडक्शनच्या मागे लपला होता साप, फणा काढून बाहेर आला आणि मग...

VIDEO : इंडक्शनच्या मागे लपला होता साप, फणा काढून बाहेर आला आणि मग...

Snake Video : पावसाळ्यात अनेकदा वेगवेगळे सरपटणारे जीव बाहेर निघत असतात. ते कोरड्या जागेच्या शोधात कुठेही निघतात. अनेकदा ते घरांमध्येही शिरतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. असाच एका सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सापांचे अनेक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. कधी गाडीच्या सीटखाली तर कधी एखाद्या कारच्या बोनटमध्ये साप लपलेले असतात. असाच एक साप एका घरात इंडक्शनच्या मागे फणा काढून बसलेला आढळून आला.

इन्स्टावर हा व्हिडीओ @gujarati_snake_guru01 नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.  व्हिडीओत साप फणा काढून हल्ला करताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला तुम्ही बघू शकता की, इंडक्शनमागे लपलेला साप हल्ला करत आहे. 

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'जय भोलेनाथ' असं लिहिण्यात आलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 61 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहे. दरम्यान, नुकताच सापाचा एक असाच व्हिडीओ समोर आला होता. ज्यात तो एका फ्रिजच्या मागे लपून बसलेला दिसत आहे.

Web Title: Snake came out behind from the induction watch video