स्मृती इराणींनी इन्स्ट्राग्रामवर सेल्फी शेअर करत विचारला हटके सवाल; तुम्हाला उत्तर माहित्येय? 

By मोरेश्वर येरम | Updated: January 3, 2021 14:44 IST2021-01-03T14:33:03+5:302021-01-03T14:44:25+5:30

कुटुंबियांसोबतचे गोंडस फोटो असो किंवा मग फोटोंना दिलेलं हटके कॅप्शन. स्मृती इराणींचं इन्स्टाग्राम अकाऊंट नेहमी चर्चेत असतं. 

smriti Irani shared a selfie on Instagram and asked tough questions Do you know the answer | स्मृती इराणींनी इन्स्ट्राग्रामवर सेल्फी शेअर करत विचारला हटके सवाल; तुम्हाला उत्तर माहित्येय? 

स्मृती इराणींनी इन्स्ट्राग्रामवर सेल्फी शेअर करत विचारला हटके सवाल; तुम्हाला उत्तर माहित्येय? 

ठळक मुद्देस्मृती इराणींची इन्स्टास्टोरीची जोरदार चर्चाइराणींनी विचारलेल्या हटके प्रश्नावर नेटिझन्सने दिल्या तितक्याच हटके प्रतिक्रियास्मृती इराणींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित्येय का?

नवी दिल्ली
केंद्रीय वस्त्रोद्योग आणि महिला, बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर चांगल्या सक्रीय असतात. स्मृती इराणींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुम्हाला मिम्स, हटके विनोदी किस्से आणि फोटोंचा खजिना पाहायला मिळेल. 

कुटुंबियांसोबतचे गोंडस फोटो असो किंवा मग फोटोंना दिलेलं हटके कॅप्शन. स्मृती इराणींचं इन्स्टाग्राम अकाऊंट नेहमी चर्चेत असतं. 

स्मृती इराणींनी काय शेअर केलं?
स्मृती इराणींनी रविवारी एक इन्स्टाग्राम स्टोरी अपलोड केली. मास्क परिधान केलेला एक सेल्फी इराणींनी पोस्ट केला आहे. या फोटोसह त्यांनी एक हटके प्रश्न विचारला आहे. 

"अगर चलती का नाम गाडी. तो दौडती का नाम...?", असा सवाल स्मृती इराणी यांनी फॉलोअर्सला विचारलाय. 

याआधी इराणींनी 'मिनिमॉन्स'चा व्हिडिओ पोस्ट केला होता. नव्या वर्षाची सुरुवात चांगली झालीय, पण जास्त उत्साहित होऊन नववर्षाला नजर लावू नका. नाहीतर या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणं परिस्थिती होईल, अशा आशयाचं कॅप्शन मिनिमॉन्सच्या विनोदी व्हिडिओवर इराणींनी दिलं होतं. या पोस्टचीही सोशल मीडियात जोरदार चर्चा झाली होती. 

Web Title: smriti Irani shared a selfie on Instagram and asked tough questions Do you know the answer