शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

सापासोबतची मस्ती पडली महागात, आधी खेळ करायला गेला अन् नंतर झाला खेळखंडोबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 13:27 IST

व्हिडिओमध्ये एक तरुण सापाला हातात पकडून सापाच्या तोंडावर फुंकताना दिसतो. यानंतर साप जे काही करतो, जे पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

सापाचं (Snake) नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो. या जीवाने एखाद्याला चावा घेतल्यास यात अनेकांचा मृत्यूही होतो. याच कारणामुळे माणसांसोबतच अनेक प्राणीही या जीवापासून दूर राहाणंच योग्य समजतात. सध्या सोशल मीडियावरसापाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Shocking Video of Snake) होत आहे . यात एका तरुणाला सापासोबत पंगा घेणं चांगलंच महागात पडल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये एक तरुण सापाला हातात पकडून सापाच्या तोंडावर फुंकताना दिसतो. यानंतर साप जे काही करतो, जे पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल (Snake Attacks on a Boy).

सोशल मीडियावर सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स मिळावे, यासाठी लोक स्वतःचा जीवही धोक्यात घालायला तयार असतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओही असाच आहे. हा व्हिडिओ एखाद्या फॅक्ट्रीमध्ये शूट केला गेला असल्याचं जाणवतं. यात एका तरुणाच्या हातामध्ये साप असल्याचं दिसतं. हा साप अतिशय लांब आणि धोकादायक दिसत आहे. मात्र, तरुण न घाबरता या सापाच्या तोंडावर फुंकताना दिसतो. यामुळे साप भडकतो. मात्र तरुणाने त्याला घट्ट पकडलेलं असतं. त्यामुळे साप काहीच करू शकत नाही.

काही वेळातच हा तरुण सापाला आपल्या डोक्याजवळ घेऊन जातो. यानंतर लगेचच साप या तरुणाला चावतो. हैराण करणारी बाब म्हणजे, बराच वेळ हा साप तरुणाच्या डोक्याला चावा घेत राहातो आणि प्रयत्न करूनही साप त्याला सोडायला तयार नसतो. हे दृश्य खरोखरच भीतीदायक आहे. हैराण करणारा हा व्हिडिओ ट्विटरवर @Folico_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 6 डिसेंबरला अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत २४ हजारहून अधिकांनी पाहिला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी तरुणाला सल्ला देत सांगितलं, की साप ही खेळण्याची वस्तू नाही. अनेकांनी या तरुणाचं कृत्य अतिशय चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. काहींनी तर या सापाचंच कौतुक केलं आहे. लोकांचं म्हणणं आहे, की अशा वेड्या लोकांना अशी अद्दल घडायला हवी. काही यूजर्सनी या तरुणाबद्दल काळजीही व्यक्त केली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरsnakeसाप