शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
2
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालच्या निकटवर्तीयाची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
3
“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
4
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
5
Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ
6
तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना
7
पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून
8
Anil Ambani News : दिवाळखोर अनिल अंबानी १५ दिवसांत कुठून देणार ₹२५९९ कोटी, कोणती नोटीस देतेय टेन्शन?
9
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
10
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
11
धनदेवता कुबेराचे ‘हे’ एक स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; अपार धनलाभ, लक्ष्मीची विशेष कृपा!
12
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
13
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
14
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
15
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
16
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
17
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
18
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
19
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
20
"...हे बेजबाबदारपणाचे लक्षण"; आयोग सत्ताधारी पक्षाकडे झुकणे म्हणजे लोकशाही धोक्यात; काँग्रेसची टीका

पतीनं दोन पत्नींना एकाच वॉर्डातून दिली उमेदवारी?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

By कुणाल गवाणकर | Published: January 08, 2021 3:33 PM

पतीनं दोन पत्नींना एकाच वॉर्डमधून उमेदवारी दिल्याच्या मेसेजसह फोटो व्हायरल

भिवंडी: सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टी व्हायरल होतात. एखादा व्हिडीओ, एखादा फोटो सोशल मीडियावर वेगळ्याच माहितीसह व्हायरल होतो. पण त्या माहितीचा संबंधित फोटो/व्हिडीओशी काहीही संबंध नसतो. अशा परिस्थितीत फोटो, व्हिडीओमधील व्यक्तींना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रकार भिवंडीतील म्हस्के कुटुंबीयांसोबत घडला आहे.भिवंडी तालुक्यातल्या ग्रामीण भागात १५ जानेवारीला ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यापैकी पिंपळास ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा आहे. सुजाता म्हस्के आणि कोमल म्हस्के निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघी शिवसेना पुरस्कृत 'श्री अग्निमाता ग्रामविकास पॅनल'च्या उमेदवार आहेत. वॉर्ड क्रमांक ४ (ड) मधून त्यांना उमेदवारी मिळाली आहे.सुजाता म्हस्के आणि कोमल म्हस्के यांचे फोटो असलेलं बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यामागचं कारण आहे दोघींच्या पतींची सारखी असलेली नावं. या दोघींच्या पतींचं नाव कल्पेश आहे. 'याला बोलतात डेरींग! दोन्ही बायका एकाच वार्ड मध्ये उभ्या केल्यात', अशा मेसेजसह सुजाता म्हस्के आणि कोमल म्हस्के यांचा फोटो असलेला बॅनर व्हायरल झाला आहे. मात्र प्रत्यक्षात सुजाता आणि कोमल यांचे पती वेगवेगळे आहेत. मात्र कुणीतरी खोडसाळपणे दोघांचा पती एकच असून त्यानं दोघींना एकाच वॉर्डातून उमेदवारी दिल्याचा मेसेज व्हायरल केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमुळे म्हस्के कुटुंबीयांना मनस्ताप भोगावा लागत आहे. सुजाता आणि कोमल म्हस्के यांच्या पतीचं नाव एकच (कल्पेश) आहे. मात्र प्रत्यक्षात कल्पेश म्हस्के नावाच्या दोन व्यक्ती आहेत. कल्पेश बारक्या म्हस्के आणि कल्पेश सुरेश म्हस्के अशी दोघांची नावं आहेत. कल्पेश बारक्या म्हस्के यांचा कल्पेश सुरेश म्हस्के हा चुलत भावाचा मुलगा लागतो. २०१६ मध्ये कल्पेश बारक्या म्हस्के यांचा विवाह सुजाता यांच्याशी झाला. तर कल्पेश सुरेश म्हस्के २०१७ मध्ये कोमल यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले. आता कोमल व सुजाता या दोघीही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकाच वॉर्डातून शिवसेना पुरस्कृत अग्निमाता ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार आहेत. मात्र त्यांच्या नावातील सारखेपणामुळे त्यांच्या बॅनरचा फोटो व्हायरल झाला आहे. यामुळे सुजाता आणि कोमल यांच्यासह त्यांच्या पतींनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.